महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिंधुदुर्गात मुसळधार पावसामुळे सव्वा कोटींचे नुकसान - sindhudurgh rain cause loss

एक जून ते आतापर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे 17 सार्वजनिक मालमत्ता बाधित झाल्या. त्यांचे 70 लाख 87 हजार 440 रुपयांचे नुकसान झाले आहे. तर, 27 खासगी मालमत्ता बाधित झाल्या असून, त्यांचे 39 लाख 95 हजार 300 रुपयांचे नुकसान झाले आहे. घर, गोठे आदींचे 11 लाख 89 हजार 289 रुपयांचे नुकसान झाले आहे.

Heavy rain in sindhudurg cause loss in crores
सिंधुदुर्गात मुसळधार पावसामुळे सव्वा कोटींचे नुकसान

By

Published : Jul 17, 2020, 7:42 PM IST

सिंधुदुर्ग - मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गेल्या दीड महिन्याच्या काळात सार्वजनिक-खासगी मालमत्तेसह घर आणि गोठ्यांची पडझड होऊन तब्बल एक कोटी 22 लाख 72 हजार 20 रुपयांचे नुकसान झाले आहे. सिंधुदुर्गात जूनच्या सुरुवातीपासूनच मुसळधार पावसाला सुरूवात झाली. त्यात वादळी वाऱ्यासह पडणारा पाऊस सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेच्या नुकसानीस कारणीभूत ठरला असतानाच निसर्ग चक्रीवादळानेही जिल्ह्यात मोठे नुकसान केले आहे.

वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यातील अनेक घरांवर झाडे पडून नुकसान होण्याचे सत्र सुरू आहे. या पावसामुळे कुडाळ तालुक्‍यात एक दुधाळ जनावर वाहून गेले. त्यानंतर वैभववाडी तालुक्‍यात एक व्यक्ती वीज पडून मृत झाला. या व्यक्तीच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. वैभववाडी तालुक्‍यात एका झोपडीचेही नुकसान झाले आहे.

एक जून ते आतापर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे 17 सार्वजनिक मालमत्ता बाधित झाल्या. त्यांचे 70 लाख 87 हजार 440 रुपयांचे नुकसान झाले आहे. तर, 27 खासगी मालमत्ता बाधित झाल्या असून, त्यांचे 39 लाख 95 हजार 300 रुपयांचे नुकसान झाले आहे. घर, गोठे आदींचे 11 लाख 89 हजार 289 रुपयांचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पक्‍क्‍या व कच्च्या अशा आठ घरांची पूर्णतः पडझड झाली आहे. यात सावंतवाडीतील 5 व मालवणमधील 3 घरांचा समावेश आहे. त्यापैकी सावंतवाडीतील 5, तर मालवणातील एक, अशी 6 घरे नुकसान भरपाईस पात्र ठरली आहेत. यातील सावंवाडीतील 5 घरांना 3 लाखांची भरपाई मिळाली आहे.

मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 98 कच्च्या घरांची पडझड झाली आहे. यात दोडामार्गातील 4, वेंगुर्लेतील 23, कुडाळमधील 25, मालवणातील 44, कणकवलीतील 2 घरांचा समावेश आहे. यापैकी दोडामार्ग, वेंगुर्ले येथील प्रत्येकी 4, कुडाळातील 20, मालवणातील एक अशी 29 घरे भरपाईस पात्र ठरली. कणकवली तालुक्‍यातील एका घराला भरपाईपोटी 15 हजार रुपये देण्यात आले आहेत.

पावसामुळे आतापर्यंत 26 गोठे बाधित झाले आहेत. दोडामार्ग, सावंतवाडी, वैभववाडी येथील प्रत्येकी एक, कुडाळ, कणकवली देवगड येथील प्रत्येकी 6, वेंगुर्लेतील 2, तर मालवण तालुक्‍यातील 3 गोठ्यांचा समावेश आहे. दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ले, देवगड, वैभववाडी प्रत्येकी एक, कुडाळ 6 व कणकवली 2 असे एकूण 13 गोठे भरपाईस पात्र ठरले आहेत. वेंगुर्ले तालुक्‍यातील एका गोठ्याला 2100 रुपयांची भरपाईची रक्कम देण्यात आली. दरम्यान, आजही पावसाचा जोर कायम होता. दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ, मालवण या तालुक्‍यांमध्ये पावसाचे प्रमाण अधिक होते.

पावसामुळे 155 पक्‍क्‍या घरांची अंशतः पडझड झाली आहे. यात दोडामार्गातील एक, सावंवाडीतील 34, वेंगुर्ले 17, कुडाळ येथील 20, मालवणातील 5, कणकवलीतील 27, देवगडमधील 39, वैभववाडीतील 12 घरांचा समावेश आहे. दोडामार्गातील एक, सावंतवाडीतील 34, वेंगुर्लेतील आठ, कुडाळातील 20, मालवणातील 5, कणकवलीतील 13, देवगडमधील 6 आणि वैभववाडीतील 11, अशी 98 घरे नुकसानभरपाईस पात्र ठरली. त्यापैकी एकूण 8 लाख 72 हजार 180 रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details