महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोकणात मान्सून सक्रिय, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा - कोकणात मान्सून

तळकोकणातून मान्सूनने आज महाराष्ट्रात प्रवेश केला. सिंधुदुर्गात रात्रीपासून पाऊस सुरू असून जिल्ह्याच्या किनारी भागात तो जोरदार कोसळला.

Heavy rain in Konkan since last night
कोकणात मान्सून सक्रिय, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

By

Published : Jun 12, 2020, 7:37 PM IST

सिंधुदुर्ग - तळकोकणातून मान्सूनने आज महाराष्ट्रात प्रवेश केला. सिंधुदुर्गात रात्रीपासून पाऊस सुरू असून जिल्ह्याच्या किनारी भागात तो जोरदार कोसळला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील 24 तासांत 77.875 सरासरी पाऊस पडला आहे.

कोकणात मान्सून सक्रिय, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

तळकोकणात कालपासून सुरू झालेल्या मान्सूनने आज चांगलाच जोर पकडला आहे. पहाटेपासून जिल्हाच्या सर्वच भागांत संततधार पाऊस पडत आहे. जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात दमदार पाऊस पडत आहे. देवगड व मालवणच्या काही भागांत पावसामुळे वीज गेली होती. देवगड तालुक्यात पावसाचा जोर अधिकच असून, मागील 24 तासांत देवगडमध्ये 140 मिमी पाऊस पडला. या पावसामुळे दहीबाव येथील अन्नपूर्णा नदी दुथडी भरून वाहात असून, नदीच्या आसपास सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. नदीच्या पुलावरून पाणी वाहात असल्यामुळे दहीबाव-आचरा रस्ता बंद झाला आहे.

कोकणात मान्सून सक्रिय, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
निसर्ग चक्रीवादळामुळे पडलेल्या पावसात जिल्हावासीयांनी भातपेरणी मोठ्या प्रमाणात करून घेतली होती. आजच्या पावसामुळे उर्वरित शेतकऱ्यांना पेरणीला संधी मिळाली, त्यामुळे शेतात जोताला बैल जुंपून अनेकजण भात पेरणी करताना दिसत होते. जिल्ह्याच्या बाजारपेठेत आज खरेदीसाठी गर्दी उसळली. मात्र, जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा व स्थानिक प्रशासन तातडीने सतर्क झाले व ही गर्दी हटविण्यात आली. कोरोनामुळे मुंबईहून चाकरमानी कोकणात मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. बऱ्याच गावात हे चाकरमानी आता शेतीच्या कामात गुंतले आहेत. त्यामुळे एरव्ही शेतीसाठी मुद्दामहून गावी येणारे चाकरमानी यावेळी आधीच दाखल झाल्याने शेतात काम करणाऱ्या गाकरी लोकांसोबत तेही वावरताना दिसत होते.
कोकणात मान्सून सक्रिय, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र भात लागवडीखाली आहे. साधारणपणे ६८ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर भातलागवड केली जाते. यावर्षी मोठ्या संख्येने दाखल झालेले मुंबईहून गावाकडे परतलेले नागरिक लक्षात घेता, हे क्षेत्र वाढेल असे शेती तज्ञांचे मत आहे. तर, मच्छीमार बांधवांनी मासेमारीला समुद्रात जाऊ नये, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details