महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुसळधार पावसाने देवगडला झोडपले; जनजीवन विस्कळीत - RAIN

देवगड तालुक्यात सलग दोन दिवस पावसाने हाहाकार उडविला आहे. सोमवारपासून सुरू असलेली पावसाची संततधार मंगळवारी दिवसभर सुरू होती. गडीताम्हाणे येथे रस्त्यावर दरड पडल्यामुळे काही काळ येथील वाहतूक कोलमडली होती

देवगड

By

Published : Jul 23, 2019, 10:57 PM IST

देवगड- मुसळधार पावसाने देवगड तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले. तालुक्यातील नद्या, नाले तुडुंब भरल्याने अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले आहेत, तर दरड कोसळण्याच्याही घटना घडल्या आहेत.

मुसळधार पावसाने देवगडला झोडपले; जनजीवन विस्कळीत

देवगड तालुक्यात सलग दोन दिवस पावसाने हाहाकार उडवलेला आहे. सोमवारपासून सुरू असलेली पावसाची संततधार मंगळवारी दिवसभर सुरू होती. गडीताम्हाणे येथे रस्त्यावर दरड पडल्यामुळे काही काळ येथील वाहतूक कोलमडली होती, तर खारेपाटण- उंडील- फणसगाव मार्गावरील मुख्य रस्त्यावर असलेल्या उंडील येथील कोजवेचा काही भाग सोमवारी झालेल्या मुसळधार पावसात वाहून गेला.

दुसरीकडे बापर्डे येथे वहाळाच्या पाण्यात वाहून जात असलेल्या वाघोटन येथील जावेद मुल्ला आणि त्यांच्या मुलाला येथील धाडसी तरुणांनी आपला जीव धोक्यात घालून वाचवले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. देवगड निपाणी महामार्गावर शिरगाव बाजारपेठ येथे ओढ्याचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत होती.

ABOUT THE AUTHOR

...view details