सिंधुदुर्ग -कोरोनाच्या महामारीमध्ये राज्यसरकार, जिल्हाप्रशासन तसेच सत्ताधारी पक्षाचे पालकमंत्री आणि आमदार यांच्याकडून सातत्याने बेजबाबदार कृत्य होत आहेत. एका बाजूला आरोग्यमंत्री रत्नागिरीत कोरोनाचा डेल्टा प्लस रुग्ण आढळल्याचे सांगत असताना रत्नागिरीचे स्थानिक आमदार आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत हे सांगतात, की रत्नागिरीला पेशंटच नाहीत. परंतु, त्याचवेळी सिंधुदुर्गातही डेल्टा प्लसचा रुग्ण आढळून येतो. मग पालकमंत्री ही बाब लपवून का ठेवत आहेत ? असा सवाल भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
पालकमंत्र्यांनी जबाबदार पद्धतीने पालकत्व निभावले पाहिजे -
कोरोनाची दुसरी लाट संपून आता तिसरी लाट येवू पाहतेय. ती येवू नये म्हणून सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. त्याबाबतीत सत्य लपवून आणि लोकांना फसवून काहीच अर्थ नाहीय. सगळ्याच बाबतीत हातसफाई करून उपयोग नाही. हे जर रोखायचं असेल, तर बाधीत रुग्णाच्या संक्रमण मार्गाचा आणि त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीचा आढावा घेवून तिसरी लाट कशी थांबवता येईल, यादृष्टीने जिल्हाप्रशासनाने काम केलं पाहिजे आणि पालकमंत्र्यांनी जबाबदार पद्धतीने पालकत्व निभावलं पाहिजे, असे आम. नितेश राणे यांनी म्हटले आहे. तर पालकमंत्री आणि आमदार यांच्याकडून सातत्याने बेजबाबदार कृत्य होत आहेत. एका बाजूला आरोग्यमंत्री रत्नागिरीत कोरोनाचा डेल्टा प्लस रुग्ण आढळल्याचे सांगत असताना रत्नागिरीचे स्थानिक आमदार आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत हे सांगतात, की रत्नागिरीला पेशंटच नाहीत. परंतु त्याचवेळी सिंधुदुर्गातही डेल्टा प्लसचा रुग्ण आढळून येतो. डेल्टा प्लस रुग्णाबाबत पालकमंत्री उदय सामंत माहिती लपवत आहेत. असेही ते म्हणाले.
दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन म्हणजे निव्वळ धुळफेक -