सिंधुदुर्ग -आगामी जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनाच सत्ता राखेळ, असा विश्वास जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना पक्षाचा भगवा प्रत्येक ग्रामपंचायतीवर फडकेल. कणकवली तालुक्यातील गांधीनगर ग्रामपंचायतीने सुरवात देखील झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात ग्रामपंचायत आणि जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीच बाजी मारेल - SATISH SAWANT LATEST NEWS
आगामी जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनाच सत्ता राखेळ, असा विश्वास जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना पक्षाचा भगवा प्रत्येक ग्रामपंचायतीवर फडकेल. कणकवली तालुक्यातील गांधीनगर ग्रामपंचायतीने सुरवात देखील झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.
गांधीनगर ग्रामपंचायत शिवसेनेकडे बिनविरोध
कणकवली तालुक्यातील गांधीनगर ग्रामपंचायत शिवसेनेकडे बिनविरोध आली आहे. या ग्रामपंचायतीमधील सातही शिवसेनेचे सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. गांधीनगर ग्रामवासियांनी शिवसेनेवर ठेवलेला विश्वास जिल्ह्यात परिवर्तन घडवणारा ठरणार आहे, असे शिवसेना नेते तथा जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत म्हणाले. ही ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून पहिल्यांदा बिनविरोध आली आहे. या ग्रामवशीयांचा विश्वास आम्ही नक्कीच वाया जाऊ देणार नाही, असेही ते म्हणाले.