सिंधुदुर्ग - वैभववाडीचे सुपुत्र गोविंद भिकाजी पाटोळे यांची 'चिनुक हेलिकॉप्टर स्क्वाड्रन'च्या कमांडिंग ऑफिसर पदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
सिंधुदुर्गचे सुपुत्र गोविंद पाटोळे चिनुकच्या कमांडिंग ऑफिसर पदी - Chinook
भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात नुकतेच चिनुक हेलिकॉप्टर नव्याने दाखल झाले आहे. या हेलिकॉप्टरच्या स्क्वाड्रनचे नेतृत्व कोकणाचे सुपुत्र गोविंद पाटोळे करणार आहेत.
भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात नुकतेच चिनुक हेलिकॉप्टर नव्याने दाखल झाले आहे. या हेलिकॉप्टरच्या स्क्वाड्रनचे नेतृत्व कोकणाचे सुपुत्र गोविंद पाटोळे करणार आहेत. पाटोळे यांची कमांडिंग ऑफिसर पदी झालेली नियुक्ती कोकण वासीयांसाठी अभिमानास्पद क्षण ठरला आहे. ग्रूप कॅप्टन गोविंद पाटोळे हे मुंबई स्थित असून ते वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा रिंगेवाडी गावचे सुपुत्र आहेत. त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण मुंबईतच झाले आहे. त्यानंतर ते NDA (नॅशनल डिफेन्स अकॅडमी) मध्ये दाखल झाले. १९९६ ला त्यांची हवाई दलात अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर ते ट्रेनिंग घेत पुढे गेले.
दरम्यानच्या काळात काश्मीरमध्ये महापूर आला होता. त्यानंतर ओडिसामध्ये महापूर, चक्रीवादळ, उत्तराखंडमध्ये महापूर अशा आपत्कालीन परिस्थितीत त्यांनी हवाई दलात उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यांनी दाखविलेल्या धाडसी कामगिरीबद्दल त्यांना 'वायू सेना' मेडल देखील मिळालेले आहे. ऑक्टोबरमध्ये काही निवडक वैमानिक व अभियंत्यांना USA मध्ये नव्या चिनुक हेलिकाप्टर्सच्या ट्रेनिंग करता पाठविण्यात आले होते. २५ मार्चला पहिले 'चिनुक हेलिकॉप्टर' वायू सेनेच्या ताफ्यात दाखल झाले आहे. ग्रूप कॅप्टन पाटोळे हे या हेलिकॉप्टर स्कॉड्रनचे कमांडिंग ऑफिसर म्हणून नियुक्त झाले आहेत.