महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विशेष : 'बीच शॅक्स' संकल्पनेचे स्वागत..पण स्थानिकांची मते तरी जाणून घ्या! - बीच शॅक्स

गोव्याच्या धर्तीवर आता कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर देखील बीच शॅक्स उभारले जाणार आहेत. त्यामुळ कोकणातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. शिवाय, स्थानिकांना देखील रोजगार निर्मिती होणार आहे.

Tarkarli Beach
तारकर्ली समुद्र किनारा

By

Published : Jul 2, 2020, 5:00 PM IST

सिंधुदुर्ग - गोव्याच्या धर्तीवर आता कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर देखील बीच शॅक्स उभारले जाणार आहेत. त्यामुळ कोकणातील पर्यटनाला तर चालना मिळणार आहे. शिवाय, स्थानिकांना देखील रोजगार निर्मिती होणार आहे. यानुसार बीचवर पर्यटकांना मर्यादित स्वरूपात बिअर, जेवण, चहा आणि नाश्ता मिळणार आहे. त्यामुळे कोकणातील नयनरम्य वातावरणात समुद्रकिनारी मौजमजा करण्याची संधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली, कुणकेश्वर याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांनाही मिळणार आहे.

गोव्याच्या धर्तीवर कोकणात बीच शॅक्स उभारल्याने याठिकाणच्या संस्कृतीवर कोणताही परिणाम होणार नाही. उलट पर्यंतनवाढीस मदत होईल. या संकल्पनेतून पर्यटनातून रोजगार सुद्धा मिळणार आहे. असे पर्यटन व्यावसायिक अरविंद मोंडकर यांनी म्हटले आहे. पर्यटनातील जलक्रीडा प्रकार इथे सुरु झाले आहे. त्याला आणखीन जोड मिळेल असेही त्यांनी म्हटले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली, कुणकेश्वर येथे होणार बीज श‌ॅक्स... पाहा स्थानिकांच्या प्रतिक्रिया...

हेही वाचा -आता कोकणातील समुद्र किनाऱ्यांवरही बीच शॅक्स; वरसोली, दिवेआगर परिसरांचा होणार विकास

संपूर्ण भारतात पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख आहे. राज्य सरकारने गोव्याच्या धर्तीवर, केरळच्या धर्तीवर विकास करण्यापेक्षा कोकणच्या किनारपट्टीवर फिशरीज व्हिलेज सारखा प्रकल्प राबवावा. कोकणच्या मातीशी मिळता जुळत पर्यटन विकास करावा. स्थानिक पर्यटन व्यावसायिक तसेच मच्छीमार यांच्याशी चर्चा करून पर्यटनाचा आराखडा तयार करणं गरजेचं आहे. असे मत मालवणमधील कृतिशील मच्छिमार महेंद्र पराडकर यांनी व्यक्त केले.

तर तारकर्ली समुद्र किनारा हा जगभरातील पर्यटकांना भुरळ घालणारा समुद्र किनारा आहे. बीच शॅक्स सारखी संकल्पना राबविण्याने पर्यटकांना आकर्षित केलं जाणार आहेच. त्यासोबत पर्यटनातून रोजगाराच्या संधीही स्थानिकांना उपलब्ध होणार आहेत. त्यासोबत शासनाने रोजगारात स्थानिकांना प्राधान्य देणं गरजेचे आहे, अशी मागणी तारकर्ली स्थानिक जितेंद्र केरकर यांनी केली. दरम्यान बीच शॅक्स येथील पर्यटनाला नवा आयाम देतील, मात्र स्थानिकांना काय वाटत हे देखील सरकारने समजून घेतले तर येथील पर्यटनाला नवी दिशा मिळेल.

ABOUT THE AUTHOR

...view details