महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Goa Congress : इतिहासाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी गोवा काँग्रेसचा सावध पवित्रा; उमेदवार ठेवले नजरकैदेत - गोवा काँग्रेस नेते

पक्षाचे आमदार फुटू नये यासाठी काँग्रेसने आपल्या सर्व उमेदवारांना (Goa Election 2022) एका खाजगी रिसॉर्टमध्ये नजरकैदेत ठेवले आहे. (Goa Congress candidate) उमेदवारांना एकत्र करून बांबोली बीच रिसॉर्टमध्ये नजरकैदेत ठेवले आहे. निवडणूक निकाल लागेपर्यंत हे सर्व उमेदवार या ठिकाणी राहणार आहेत.

Goa Congress
गोवा काँग्रेस

By

Published : Mar 9, 2022, 10:20 AM IST

Updated : Mar 14, 2022, 12:50 PM IST

पणजी - निवडणूक निकालाधीच पक्षाचे आमदार फुटू नये यासाठी काँग्रेसने आपल्या सर्व उमेदवारांना एका खाजगी रिसॉर्टमध्ये नजरकैदेत ठेवले आहे. (Goa Congress candidate in custody) इतिहासाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी काँग्रेसने सावध पवित्रा घेत आपल्या सर्व उमेदवारांना एकत्र करून बांबोली बीच रिसॉर्टमध्ये नजरकैदेत ठेवले आहे. (Goa Congress cautious) निवडणूक निकाल लागेपर्यंत हे सर्व उमेदवार या ठिकाणी राहणार असून, त्यांनतर विजयी उमेदवारांना येथून सुरक्षितस्थळी नेऊन सरकार स्थापन करेपर्यंत या उमेदवारांवर नजर असणार आहे.

दिगंबर कामतांनी पूर्ण बहुमताने विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केला

केंद्रीय नेतृत्व गोव्यात दाखल

आगामी विधानसभा निवडणुक निकालानंतर कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी केंद्रीय निरीक्षक पी. चिदंबरम, दिनेश गुंडूराव व कर्नाटकचे विरोधी पक्षनेते गोव्यात दाखल झाले असून, ते सर्व परिस्थिती हाताळत आहेत.

राज्यात आमचेच सरकार - दिगंबर कामत

उद्या निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड युतीचे सरकार स्थापन होणार असल्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी सांगितले. कामत सध्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.

इतिहासाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी काँग्रेस चा सावध पवित्रा

2017 साली राज्यातील सर्वाधिक 17 आमदार असताना काँग्रेसने सत्ता स्थापन करण्यात दिरंगाई केली होती. याचाच फायदा घेऊन भाजपने स्थानिक पक्ष व अपक्ष यांच्या मदतीने राज्यात सत्ता स्थापन केली होती. त्यातच (10 जुलै 2019)ला काँग्रेसला आणखी एक धक्का देत भाजपाने 10 आमदारांना आपल्या गळाला लावले होते. त्यातूनच धडा घेत काँग्रेसने इतिहासाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी यावेळी विशेष काळजी घेतली आहे.

हेही वाचा -Anil Deshmukh Bail Hearing : अनिल देशमुख यांना जामीन? मुंबई सत्र न्यायालय आज निकाल देणार

Last Updated : Mar 14, 2022, 12:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details