सिंधुदुर्ग -कणकवली शहराच्या वेशीवर असलेला गडनदी पूल अखेर इतिहास जमा झाला. चौपदरीकरण ठेकेदार कंपनी दिलीप बिल्डकॉनने होळीच्या मुहूर्तावर हा जुना पूल तोडण्याचे काम हाती घेतले. सध्या नव्या गडनदी पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
कणकवलीच्या वेशीवरील गडनदी पूल इतिहासजमा; मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी तोडला - कणकवली सिंधुदुर्ग
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणामध्ये सर्वच जुने ग्रिट खालील पूल पाडण्यात येणार आहेत. त्या ठिकाणी नवीन पूल उभारले जात आहेत. याचाच एक भाग असलेला कणकवली शहरालगतचा गडनदीवरील पूल पाडण्यात आला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर असलेला हा ब्रिटीश कालीन पूल आहे. इंग्रजांच्या काळात १९२५ पासून मुंबई आणि गोव्याला जोडणारा महामार्ग तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. १९३४ मध्ये कणकवलीतील गड नदी पुलाचे काम पूर्ण झाले. या पुलाच्या बांधणीसाठी ३ वर्षांचा कालावधी लागला होता. तसेच गडनदी पुलाच्या बांधणीसाठी त्याकाळी सुमारे सव्वा लाख रुपये एवढा खर्च आला होता.
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणामध्ये सर्वच जुने ग्रिट खालील पूल पाडण्यात येणार आहेत. त्या ठिकाणी नवीन पूल उभारले जात आहेत. याचाच एक भाग असलेला कणकवली शहरालगतचा गडनदीवरील पूल पाडण्यात आला आहे. हे काम सुरू असताना अनेक नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी नागरिकांनी हळहळ देखील व्यक्त केली. ब्रिटिशकालीन बांधकामे ऐतिहासिक ठेवा आहेतच. शिवाय ते स्थापत्य कलेचा उत्कृष्ठ नमुना देखील आहेत. त्यामुळे त्यांचे जतन व्हावे, अशीही अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.