सिंधुदुर्ग -गोव्यात शुक्रवारी आणखी ६१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या दोन हजारांजवळ पोहोचली आहे. तर शुक्रवारी २,४५५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून, २,९६० जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे १,९९८ जणांचा मृत्यू झाला आहे.
गोव्यातील कोरोना स्थिती
कोविड मृतांचा आकडा कमी करण्यासाठी राज्य सरकार विविध मार्गांनी प्रयत्न करत आहे. तरीही दररोजचा मृतांचा आकडा अजूनही ६० पेक्षा अधिकच आहे. १ ते १४ मे या कालावधीत तब्बल ८१५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे १,९९८ जणांचा मृत्यू झाला आहे. गोव्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ही १,३२,५८५ वर पोहोचली असून, आतापर्यंत ९८,२०० जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात ३२,३८७ सक्रिय रुग्ण आहेत.