सिंधुदुर्ग: जिल्हा न्यायालयाच्या बाहेर पोलिसांशी हुज्जत घातल्या प्रकरणी माजी खासदार निलेश राणे MP Nilesh Rane यांची न्यायालयाने दोष मुक्तता केली आहे. पोरस येथील न्यायालयात याबाबत दावा सुरू होता.
Nilesh Rane: माजी खासदार निलेश राणे यांची निर्दोष मुक्तता - MP Nilesh Rane
Nilesh Rane: जिल्हा न्यायालयाच्या बाहेर पोलिसांशी हुज्जत घातल्या प्रकरणी माजी खासदार निलेश राणे MP Nilesh Rane यांची न्यायालयाने दोष मुक्तता केली आहे. पोरस येथील न्यायालयात याबाबत दावा सुरू होता.
या प्रकरणांमुळे गुन्हा दाखल संतोष परब हल्ला प्रकरणात आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी जिल्हा न्यायालयात सुरू असताना याच दरम्यान हायकोर्टाकडून आमदार नितेश राणे यांना अटकेपासून 10 दिवसांसाठी दिलासा देण्यात आला होता. यावेळी आमदार नितेश राणे कोर्टातून बाहेर पडत असताना पोलिसांकडून आमदार नितेश राणे यांना अटकेचा प्रयत्न केला जात असताना त्यांना अटकाव करताना पोलिसांशी हुज्जत घातल्या प्रकरणी माजी खासदार निलेश राणे यांच्याविरुद्ध ओरोस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
निर्दोष मुक्तता याची सुनावणी आज ओरोस जिल्हा न्यायालयात न्यायाधीश ए. एम. फडतरे यांच्या कोर्टात सुरू असताना न्यायाधीश फडतरे यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात माजी खासदार निलेश राणे यांच्यासह भाजप युवा नेते आनंद शिरवलकर, युवा मोर्चा अध्यक्ष श्रीपाद तवटे, कणकवली भाजप अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कुडाळ तालुकाध्यक्ष तुकाराम साईल, तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष रुपेश बिडये यांना सबळ पुरावे अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.