सिंधुदुर्ग- जिल्ह्यातील दोडामार्ग आडाळी येथील केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाचा आयुर्वेद संशोधन प्रकल्प हस्तांतरणावरून सुरू झालेला वाद अधिकच पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. खासदार विनायक राऊत यांनी हा प्रकल्प पळवून नेण्याच्या आपल्याच आघाडी सरकारमधील सहकारी मंत्र्यांचा धिक्कार केला असून आम्ही मेलेल्या आईचे दूध प्यायलेलो नाही, असे म्हटले होते. यावर नवखा काँग्रेसी मंत्री तुमच्या नाकावर टिच्चून प्रकल्प पळवण्याची दादागिरी करतो? ही गोष्ट म्हणजे, आताची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची स्वाभिमानी सेना नाही, असा टोला भाजपाचे प्रदेश सचिव माजी आमदार प्रमोद जठार यांनी लगावला आहे.
आता बाळासाहेबांची स्वाभिमानी सेना उरलेली नाही, माजी आमदार प्रमोद जठार यांचा टोला - सिंधुदुर्ग भाजप बातमी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग आडाळी येथील केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाचा आयुर्वेद संशोधन प्रकल्प हस्तांतरणावरून सुरू झालेला वाद अधिकच पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
माजी आमदार प्रमोद जठार
खासदार विनायक राऊत म्हणाले होते, की केंद्राकडून कोकणसाठी मंजूर केलेला हा प्रकल्प लातूरला हलवा, अशी मागणी सहकारी काँग्रेसचे मंत्री अमित देखमुख यांनी केली आहे. देशमुख यांनी केलेला हा प्रकार निंदनीय असून दिवंगत विलासराव देशमुख असते, तर अशा घटना झाल्या नसत्या. अमित देशमुख यांनी आम्हाला भेटायला वेळ दिला नाही, आमच्या पत्रांना उत्तरे दिली नाहीत. एवढेच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनादेखील साधी भेटही देण्याचे नकारल्याचा गौप्यस्फोट खासदार राऊत यांनी केला होता.
Last Updated : Oct 7, 2020, 10:52 PM IST