महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिंधुदुर्गमध्ये अंध, अपंगांना मनसेकडून मदतीचा हात, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप - sindhudurg latest news

लॉकडाऊनच्या काळात गरजूंच्या मदतीसाठी मनसेचे कार्यकर्ते धावून आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंध आणि अपंग बांधवांना मनसेकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील अंध, अपंग आणि मतिमंद असलेल्या 350 कुटुंबाची यादी त्यांनी बनवली होती.

mns distributed essential things to needy
अपंगांना मनसेकडून मदतीचा हात

By

Published : May 15, 2020, 12:19 PM IST

Updated : May 15, 2020, 12:45 PM IST

सिंधुदुर्ग - लॉकडाऊनच्या काळात गरजूंच्या मदतीसाठी मनसेचे कार्यकर्ते धावून आले. जिल्ह्यातील अंध आणि अपंग बांधवांना मनसेकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले.

अपंगांना मनसेकडून मदतीचा हात

जिल्ह्यातील अंध, अपंग आणि मतिमंद असलेल्या 350 कुटुंबाची यादी त्यांनी बनवली होती. सध्या लॉकडाऊनच्या काळात सर्वच लोकांकडून दुर्लक्षित राहिलेला हा घटक असून त्यांना या वस्तूंची गरज आहे. हे लक्षात घेऊन आपण हे वाटप करत असल्याचे माजी आमदार उपरकर म्हणाले. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन दाभोळकर, दया मेस्त्री आदी उपस्थित होते.

Last Updated : May 15, 2020, 12:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details