सिंधुदुर्ग - जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नद्या, नाले भरून वाहू लागले आहेत. काही ठिकाणी तर पुलावरून पाणी वाहत असल्याने काही गावांचा संपर्क तुटला होता. 1 जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी 766.45 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
गेल्या दोन दिवसापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस, काही गावांचा संपर्क तुटला
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नद्या, नाले भरून वाहू लागले आहेत. काही ठिकाणी तर पुलावरून पाणी वाहत असल्याने काही गावांचा संपर्क तुटला होता.
गेल्या 2 दिवसापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस
मान्सूनच्या आगमनानंतर दोन दिवस पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. परंतु, सोमवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. संपूर्ण जिल्ह्यात हा पाऊस कोसळत आहे.
Last Updated : Jun 17, 2020, 6:41 PM IST