महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तिलारी नदी काठच्या गावांना धोक्याचा इशारा, जिल्ह्यात पाऊस थांबेना - heavy rain fall in sindhudurga

जिल्ह्यात अनेक ठिकाणी महत्वाचे मार्गही पाण्याखाली गेले होते. धरण परिक्षेत्रात मंगळवार पासून मुसळधार कोसळत असलेल्या पावसाने तिलारी आंतरराज्य प्रकल्पामध्ये एकूण ३४५.५२९० द.ल.घ.मी पाणीसाठा झाला आहे. सध्या हे धरण ७७.२४ टक्के भरले आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात १६४.४० मि.मी पावसाची नोंद झाली असून यंदाच्या मोसमात एकूण १७०४.८० मि.मी पाऊस झाला आहे. धरणातील अतिरिक्त पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.

tilari
तिलारी नदी काठच्या गावांना धोक्याचा इशारा

By

Published : Jul 9, 2020, 10:51 AM IST

सिंधुदुर्ग - तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने धरणाच्या पाणी साठ्यात वेगाने वाढ होत आहे. धरणातील पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने धरणात येणारे अतिरिक्त पाणी नियंत्रित पद्धतीने पुच्छ कालव्याद्वारे तिलारी नदीत सोडण्यात येणार आहे. तसेच धरणाच्या परिसरात पाऊस सुरू असल्यामुळे खरारी नाल्यातील पाणी नदी पात्रात येऊन नदीच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीलगतच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे मालवण तालुक्यातील घुमडे येथील घुमडाई मंदिरात पाणी घुसले आहे. संपूर्ण मंदिरास पाण्याने वेढा दिला आहे.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी महत्वाचे मार्गही पाण्याखाली गेले होते. धरण परिक्षेत्रात मंगळवार पासून मुसळधार कोसळत असलेल्या पावसाने तिलारी आंतरराज्य प्रकल्पामध्ये एकूण ३४५.५२९० द.ल.घ.मी पाणीसाठा झाला आहे. सध्या हे धरण ७७.२४ टक्के भरले आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात १६४.४० मि.मी पावसाची नोंद झाली असून यंदाच्या मोसमात एकूण १७०४.८० मि.मी पाऊस झाला आहे. धरणातील अतिरिक्त पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या ओरोस जैतापकर कॉलनी येथे अक्षरशा पूर आला आहे. येथील उंच रस्त्यामुळे पावसाचे पाणी नजिकच्या घरात घुसत आहे. तोच प्रकार जैतापकर कॉलनी येथे झाला आहे. ओरोस येथून कसालकडे जाताना डाव्या बाजुचे पाणी जैतापकर कॉलनीमधील वस्तित घुसले. हे पाणी तेथील बंगले, बिल्डिंगच्या तळापर्यंत पोहोचले आहे. परिणामी येथील रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मुसळधार पावसाचा फटका मालवण तालुक्यातील घुमडे येथील घुमडाई मंदिरास बसला आहे. मंदिराच्या लगत असलेल्या ओहोळात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने मंदिरात पाणी घुसले आहे. पूर्ण मंदिरास सध्या पाण्याने वेढा घातला असल्याचे दिसून येत आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी ९४.०७५ मि.मी पाऊस झाला असून आतापर्यंत एकूण १६९४.९०० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details