महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिंधुदुर्ग आरटीओ कार्यालयातील वाहन कर घोटाळाप्रकरणी पाच कर्मचारी निलंबित - सिंधुदुर्ग आरटीओ कार्यालय

गेल्या दोन वर्षात सुमारे १०० वाहनांचा कर न भरता कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या सिंधुदुर्ग आरटीओ कार्यालयातील पाच कर्मचाऱ्यांवर अखेर कारवाई झाली आहे. याबाबत पोलीस खात्यामार्फत व आरटीओ कार्यालय खात्यांतर्गत चौकशी होऊन ही कारवाई करण्यात आली.

Sindhudurg RTO Office
सिंधुदुर्ग आरटीओ कार्यालय

By

Published : Nov 26, 2020, 5:36 PM IST

सिंधुदुर्ग - जिल्हा आरटीओ कार्यालयातील वाहन कर घोटाळाप्रकरणी पाच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. स्वप्निल मुंडेकुळे, श्रावणी मयेकर, सिद्धेश्वर घुले, समदळे व माने या पाच लिपिक कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

वाहनांची नोंदणी करण्यात आली, मात्र वाहन करच भरला नव्हता. २०१८पासून गेल्या दोन वर्षात सुमारे १०० वाहनांचा कर न भरता कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात आला होता. याबाबत पोलीस खात्यामार्फत व आरटीओ कार्यालय खात्यांतर्गत चौकशी होऊन वाहन कर घोट्याळ्यात प्रथमदर्शनी कसूर केल्याचे आढलेल्या पाच कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा - 26/11 हल्ल्याची १२ वर्षे : राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्र्यांनी वाहिली हुतात्म्यांना श्रद्धांजली

सिंधुदुर्ग जिल्हा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत वाहन रजिस्ट्रेशन व आकर्षक नंबरप्लेटचे काम करून देणाऱ्या खासगी व्यक्तीकडून बनावट खोटे वाहन परवाने देऊन रजिस्ट्रेशनची व आकर्षक नंबरची रक्कम स्वीकारली गेली, मात्र त्यात घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते.

हेही वाचा - LIVE : वाढीव वीज बिलाविरोधात मनसेचे राज्यव्यापी आंदोलन

याबाबत आमदार वैभव नाईक यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे तक्रार करून वाहन कर घोटाळ्याप्रकरणी संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर मागील महिन्यात परिवहन मंत्र्यांच्या दालनात बैठक झाली त्यावेळी ना. अनिल परब यांनी वाहन कर घोटाळ्यातील जे अधिकारी दोषी आहेत, त्यांची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. सोमवारी आमदार वैभव नाईक यांनी पुन्हा अनिल परब यांची भेट घेऊन याबाबत विचारणा केली होती. त्यानुसार सिंधुदुर्ग आरटीओ कार्यालयातील वाहन कर घोटाळाप्रकरणी पाच कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details