सिंधुदुर्ग - जिल्ह्यासह शासनाच्या नव्या धोरणानुसार संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवरील राज्यात 1 जून ते 31 जुलै या 61 दिवसांच्या मासेमारी बंदी कालावधीला एक जूनपासून सुरुवात होणार आहे, तर एक ऑगस्टला मासेमारीला सुरुवात होणार आहे. बंदी कालावधीत मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांविरोधात महाराष्ट्र सागरी अधिनियम 1981अन्वये कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे मत्स्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता मच्छिमारांचे लक्ष खाडीकिनारी लागले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक जूनपासून मासेमारी बंद - sindhudurg update
सिंधुदुर्ग जिल्ह्याला 121 किमी लांबीची किनारपट्टी लाभली आहे. यात मालवण, देवगड व वेंगुर्ले हे तीन तालुके मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहेत. शासन निर्णय होण्यापूर्वी महाराष्ट्रात 10 जून ते 16 ऑगस्ट असा मासेमारी बंदी कालावधी होता.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला 121 किमी लांबीची किनारपट्टी लाभली आहे. यात मालवण, देवगड व वेंगुर्ले हे तीन तालुके मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहेत. शासन निर्णय होण्यापूर्वी महाराष्ट्रात 10 जून ते 16 ऑगस्ट असा मासेमारी बंदी कालावधी होता. मात्र, महाराष्ट्रालगत असलेल्या गोवा, कर्नाटक, केरळ व गुजरात या राज्यांचा मासेमारी बंदी कालावधी लवकर संपत असल्याने तेथील टॉलर्स, बोटींची घुसखोरी होऊन महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरील मासळीची लयलूट केली जायची. त्यामुळे पारंपरिक मच्छीमार बांधव व संघटनांनी शासनाकडे किनारपट्टीवर एकाचवेळी मासेमारी बंदी असावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार 1 जून ते 31 जुलै हा मासेमारी बंदी कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
यांत्रिक बोटीच्या सहाय्याने करण्यात येणारी मासेमारी बंद होत असल्याने आता मत्स्य खवय्यांना खाड्यांमधील मासळीवर लक्ष ठेवून राहावे लागणार आहे. बिगर यांत्रिक बोटीतून मासेमारी करण्यास कोणतीही बंधने नाहीत. त्यामुळे मच्छीमार व खाडीकिनारी राहणाऱ्या मत्स्यप्रेमींना भरतीच्या पाण्यात खाडीत येणारी मासळी पडकण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. दरम्यान, सध्या सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील मासेमारीच्या बहुतांश मोठ्या नौका किनाऱ्यावर सुरक्षितस्थळी आणून ठेवण्यासाठी मच्छीमार बांधवांची लगबग सुरू झाली आहे.