महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Fishermen Boat Lost : इंजिन बंद पडल्याने खोल समुद्रात नौका भरकटली, अखेर वाचले प्राण - Asmita Speedboat

सोसाट्याचा वारा त्यात खवळलेला समुद्र अशा परिस्थितीत समुद्रात चार मच्छीमरांचा जीव वाचवण्यात पोलिसांना यश आले ( Marine Police Saved Fishermen Lives In Sindhudurg ) आहे. देवगड कुणकेश्वर मोरवेसमोर पंधरा ते सोळा किलोमीटर खोल समुद्रात इंजिन बंद पडल्याने शुक्रवारी सागर रथ ही मासेमारी नौका ( Sagar Rath Boat Lost In Sea ) भरकटली. बोटीवर चार मच्छिमार होते.

Fishermen Lives Save
मच्छीमरांचे प्राण वाचवले

By

Published : Nov 12, 2022, 12:00 PM IST

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात भर समुद्रात चार मच्छीमरांचा जीव वाचवण्यात पोलिसांना यश आले ( Marine Police Saved Fishermen Lives In Sindhudurg ) आहे. मालवण समुद्रात गस्तीवर असलेल्या सागरी पोलिसांनी हे थरारक बचावकार्य केले आहे. दैव बलत्तर म्हणून नौकेसह चारही मच्छिमार सुखरूप किनाऱ्यावर परतले ( Fisherman Boat Sank In The Malvan Sea ) आहेत. सोसाट्याचा वारा त्यात खवळलेला समुद्र अशा परिस्थितीत या मच्छीमारांना वाचवण्यात यश आले आहे.

मच्छीमरांचे प्राण वाचवले

इंजिन बंद पडल्याने नौका भरकटली :देवगड कुणकेश्वर मोरवेसमोर पंधरा ते सोळा किलोमीटर खोल समुद्रात इंजिन बंद पडल्याने शुक्रवारी सागर रथ ही मासेमारी नौका ( Sagar Rath Boat Lost In Sea ) भरकटली. बोटीवर गुरुनाथ कातवणकर, प्रतीक शिंदे, निलेश जोईल, सिद्धेश जोईल सर्व रा. देवगड कुणकेश्वर कातवण हे मच्छिमार होते.

फायबरची नौका : देवगड तालुक्यातील कातवण येथून गुरुनाथ कातवणकर, प्रतीक शिंदे, निलेश जोईल आणि सिद्धेश जोईल हे चौघे मच्छीमार शुक्रवारी पहाटे चार वाजता 'सागर रथ' नावाची फायबरची नौका घेऊन गिलनेट मासेमारीस गेले होते. यावेळी अचानक त्यांच्या नौकेचे इंजिन बंद पडल्याने त्यांची नौका कुणकेश्वर- मोरवे समोरील सुमारे पंधरा ते सोळा वावापर्यंत भरकटली होती. नौका एका जागेवर थांबवण्यासाठी त्यांनी नांगरही टाकला होता. परंतु याचदरम्याने वाऱ्याचा जोर जास्त होता. त्यामुळे नौकेचा नांगर तुटला आणि नौका भरकटत पुढे गेली.

'सिंधु' स्पीडबोट : याबाबतची खबर सागरी पोलिसांना दिली गेली असता सागरी पोलीस निरीक्षक जे. बी. साळूंखे यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण येथील सागरी पोलीस निरीक्षक एस. पी. खंदारे, पी. आर. तांडेल, एस. के. कांबळे, ए. बी. सावंत आदींचे पथक 'अस्मिता' ही स्पीडबोट घेऊन रवाना झाले. अस्मिता स्पीडबोटने त्यांच्यापर्यंत पोहचत त्यांना कातवण किनाऱ्याच्या दिशेने नेले. त्यानंतर देवगड येथील 'सिंधु' स्पीडबोटने त्यांना शुक्रवारी सुखरुप कातवण किनाऱ्यावर नेण्यात आले. सागरी पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल मच्छीमारांनी आभार मानले.


ABOUT THE AUTHOR

...view details