महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कणकवली बाजारपेठेत भीषण आग, दोन दुकाने जळून खाक - Sindhudurg breaking news

कणकवली बाजारपेठेत भीषण आग लागली होती. या आगीत दोन दुकाने जळून खाक झाली आहेत. नगरपंचायतीच्या अग्निशमन बंबात पाणीच नसल्याने आग विझविण्यात विलंब झाला.

fire at Kankavali market
कणकवली बाजारपेठेत आग

By

Published : Nov 1, 2020, 10:49 AM IST

सिंधुदुर्ग - कणकवली येथील पटवर्धन चौकातील बाणे ब्रदर्स यांच्या तंबाखू आणि किराणा दुकानाला भीषण आग लागली. रविवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आगीची झळ बाजूच्या डी कलेक्शन या कापड दुकानाला बसली. या आगीत दोन्ही दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे.

कणकवली बाजारपेठेत आग

आग विझविण्यात विलंब

सुरुवातीला नागरिकांनी आग लागल्याची माहिती नगरपंचायतीला दिली. मात्र नगरपंचायतीच्या अग्निशमन बंबात पाणीच नसल्याने आग विझविण्यात विलंब झाला. उपस्थित नागरिकांनी जवळच्या हॉटेल डायमंडमधील नळाच्या पाण्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग भीषण असल्याने आटोक्यात आली नाही.

नागरिकांनी केला खबरदारीचा उपाय

खबरदारी म्हणून डी कलेक्शन दुकानातील कपडे नागरिकांनी बाहेर काढले. त्यानंतर उशिरा नगरपंचायतीच्या अग्निशमन बंबाच्या माध्यमातून आग विझविण्यात आली. घटनास्थळी प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार रमेश पवार यांनी भेट देऊन पाहणी केली.

यावेळी शिवसेनेचे नेते संदेश पारकर, नगरसेवक सुशांत नाईक, संजय मालंडकर, हळदीवे संजय कामतेकर, बंडू गांगण, मेघा गांगण, महेंद्र सांबरेकर, संकेत नाईक, वैभव आरोलकर, संतोष पुजारे, प्रसाद अंधारी, अनिल येडवे, प्रज्वल वर्धम, पांडु वर्धम, राजन पारकर, सुनील पारकर, तुषार कोदे उपस्थित होते.

हेही वाचा-चालत्या एसटी बसमध्ये वृद्धाचा मृत्यू; मृतदेह घरी नेण्यासाठी नातीचा गोंधळ

हेही वाचा-महिलेवर सामूहिक बलात्कारप्रकरणी दोन आरोपी जेरबंद: बीडच्या साळेगावातील घटना

ABOUT THE AUTHOR

...view details