सिंधुदुर्ग - दंड करून व हमीपत्र लिहून घेऊनही वारंवार गुरांच्या मालकांकडून गुरे मोकाटपणे चरायला सोडली जातात. देवगड नगर पंचायतीने अशा गुरांच्या मालकांवर तक्रारी दाखल करण्यास सुरूवात केली आहे. देवगड पोलिसांनी गुरांचे मालक अजित सकपाळ यांच्यावर भादवि. कलम 289, गुरांच्या अतिक्रमणविषयी अधिनियम 1871 कलम 25 याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. देवगड पोलिसांनी केलेली ही जिल्ह्यातील पहिलीच कारवाई असून, याबद्दल नागरिकांनी पोलिसांचे अभिनंदन केले आहे.
सिंधुदुर्गात पहिल्यांदाच भटक्या गुरांच्या मालकावर गुन्हा दाखल - भटक्या गुरांच्या मालकावर गुन्हा
दंड करून व हमीपत्र लिहून घेऊनही वारंवार गुरांच्या मालकांकडून गुरे मोकाटपणे चरायला सोडली जातात. देवगड नगर पंचायतीने अशा गुरांच्या मालकांवर तक्रारी दाखल करण्यास सुरूवात केली आहे. देवगड पोलिसांनी गुरांचे मालक अजित सकपाळ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
![सिंधुदुर्गात पहिल्यांदाच भटक्या गुरांच्या मालकावर गुन्हा दाखल Filed a case against the owner of a stray cattle in sindhudurg](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8223873-81-8223873-1596040836892.jpg)
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोकाट गुरांचा प्रश्न फारच बिकट बनत आहे. देवगडमध्ये हा प्रश्न भीषण आहे. या मोकाट जनावरांची माहिती गोळा करण्यासाठी निलेश श्रीपाद कणेरकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. ते नगरपंचायत देवगड जामसंडे या ठिकाणी गेल्या 3 वर्षापासून पाणी वितरक म्हणून नोकरीस आहेत. त्यांना त्या कामासह पर्यायी काम म्हणून मोकाट फिरणाऱ्या जनावरांची माहिती घेण्यास सांगितले आहे. तसेच त्या गुरांच्या कानास नगरपंचायत देवगड जामसंडेचे टॅग लावून, संबंधित गुरे मालकांना गुरे कोणत्याही रस्त्यावर खासगी व सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमण करू नये म्हणून तोंडी सूचना देण्याचे काम देण्यात आले आहे.