सिंधुदुर्ग -खासदार विनायक राऊतांना धमकी देणाऱ्या निलेश राणेंवर गुन्हा दाखल करा अशी मागणी करत आज सिंधुदुर्गातील शिवसैनिकांनी कणकवली पोलिसांकडे निवेदन सादर केले आहे. दिसशील तिथे फटके खाशील, अशा शब्दात खासदार विनायक राऊतांना निलेश राणेंनी धमकीवजा इशारा दिला होता. त्यावरून आता शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.
पोलिसांना सादर केले निवेदन
माजी खासदार निलेश नारायण राणे यांनी दिनांक ९ फेब्रुवारी रोजी एका व्हिडीओ क्लिपव्दारे शिवसेना सचिव खासदार विनायक भाऊराव राऊत यांच्या विरुद्ध अपमानास्पद प्रक्षोभक विधान करून विनायक राऊत यांना मारहाण करणार अशी धमकी दिली आहे. याप्रकरणी माजी खासदार निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेना शिष्टमंडळाने कणकवली पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. तसेच याप्रश्नी शिवसेनेकडून काही विपरीत घडल्यास याला पोलीस प्रशासन जबाबदार असेल असा इशारा ही यावेळी दिला आहे. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, सुजित जाधव, महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत पालव, नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, सचिन सावंत, अँड हर्षद गावडे, राजु राठोड, युवासेनेचे गीतेश कडू आदी उपस्थित होते.
काय म्हणाले होते निलेश राणे
खासदार राऊत यांनी नारायण राणे आणि फडणवीसांवर केलेल्या टिकेला प्रत्युत्तर देताना निलेश राणे यांनी विनायक राऊत यांच्यावर जहरी टीकास्त्र सोडले आहे. तसेच विनायक राऊत यांनी स्वत:ची भाषा न बदलल्यास जिथे दिसेल तिथे फटके लावणार असल्याचा इशारा देखील निलेश राणे यांनी दिला होता.
जिथे असशील तिथे फटके देईन-