सिंधुदुर्ग : भाजपा आमदार नितेश राणे ( BJP MLA Nitesh Rane ) यांच्याकडून भाजपाचा सरपंच निवडून आणण्यासाठी चक्क पन्नास लाख रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. वैभववाडी तालुका कार्यकर्ता आढावा बैठकीत बोलताना त्यांनी भाजपाची बिनविरोध ग्रामपंचायत ( Unopposed Gram Panchayat of BJP ) येईल त्या गावाला 50 लाखाचा निधी देऊ अशी घोषणाच केली आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितेश राणेंकडून प्रलोभनाचा प्रयत्न केला गेला असल्याचे या व्हिडिओतून समोर येत आहे. जो गाव भाजपाचा सरपंच आणि सदस्य बिनविरोध निवडून देईल त्या गावाला 50 लाख निधी देऊ असे त्यांनी जाहीर केले आहे. सरपंच आणि सदस्य निवडीसाठी लागेल ती ताकद पुरविण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
BJP MLA Nitesh Rane : आमदार नितेश राणे यांच्याकडून भाजपचा सरपंच आणण्यासाठी 50 लाखांची ऑफर - आमदार नितेश राणे
भाजपा आमदार नितेश राणे ( BJP MLA Nitesh Rane ) यांच्याकडून भाजपाचा सरपंच निवडून आणण्यासाठी चक्क पन्नास लाख रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. जो गाव भाजपाचा सरपंच आणि सदस्य बिनविरोध निवडून देईल त्या गावाला 50 लाख निधी देऊ असे त्यांनी जाहीर केले आहे. सरपंच आणि सदस्य निवडीसाठी लागेल ती ताकद पुरविण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
निवडणुकीच्या निमित्ताने मोठी मोर्चे बांधणी :सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांची आचारसंहिता सुरू आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच पक्ष निवडणूक रिंगणात आपली ताकद अजमावण्यासाठी तयार आहेत. आमदार नितेश राणे यांनी आपल्या मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने मोठी मोर्चे बांधणी केली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी वैभववाडी येथे भाजपा पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. याचवेळी त्यांनी कार्यकर्त्यांना या निवडणुकीत यश मिळविण्या संदर्भात आवाहन करताना जो गाव भाजपाची बिनविरोध ग्रामपंचायत देईल त्या गावाला 50 लाखाचा विकास निधी दिला जाईल अशी घोषणा केल्याचे आता समोर आले आहे.
आढावा बैठक पार पडली :सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत असून तो भाजपाच्या वैभवाडी कार्यालयातला असल्याचे सांगितले जात आहे. आमदार नितेश राणे यांनी आचारसंहिता जाहीर होण्याच्या पूर्वी 9 नोव्हेंबर रोजी वैभववाडी भाजपा कार्यालयात आढावा बैठक घेतली होती. यानंतर 22 नोव्हेंबरला देखील आढावा बैठक पार पडली याच दरम्यानचा तो व्हिडिओ असल्याचे समोर येत आहे.