महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 13, 2021, 9:45 AM IST

ETV Bharat / state

सिंधुदुर्गात बुधवारी कोरोनाने पंधरा जणांचा मृत्यू, 16 वर्षीय मुलीचाही समावेश

जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. रुग्ण वाढीबरोबरच एका दिवसात कोरोनाने 15 रुग्ण दगावले आहेत. यापैकी सात रुग्ण हे 60 वर्षांच्या आतील आहेत, तर यात एका 16 वर्षीय मुलीचाही समावेश आहे.

सिंधुदुर्गात कोरोनाने पंधरा जणांचा मृत्यू
सिंधुदुर्गात कोरोनाने पंधरा जणांचा मृत्यू

सिंधुदुर्ग- जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. बुधवारी तर कोरोनाचा विस्फोट झाला. एका दिवसात तब्बल 672 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. आतापर्यंतची ही एका दिवसात रुग्ण आढळण्याची उच्चांकी संख्या आहे. रुग्ण वाढीबरोबरच कोरोनाने मृत्यूही एका दिवसात 15 झाले आहेत. यात एका 16 वर्षीय मुलीसह सात रुग्ण हे 60 वर्षांच्या आतील आहेत. कोरोना रुग्णवाढ वेगाने होत असून, बाधित रुग्णांची एकूण संख्या 18 हजार 239 झाली आहे. तर 232 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 12 हजार 261 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सक्रिय रुग्ण संख्या 5 हजार 537 वर गेली आहे.

266 रुग्ण ऑक्सिजनवर, तर 38 रुग्ण व्हेंटिलेटरवर

जिल्हय़ातील पॉझिटिव्ह रुग्णांमधील 304 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून त्यातील 266 रुग्ण ऑक्सिजनवर, तर 38 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. जिल्ह्यातील सद्यस्थिती नवीन पॉझिटिव्ह रुग्ण एकूण 672, एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 18 हजार 239 इतके आहेत. सद्यस्थितीतील एकूण सक्रिय रुग्ण 5 हजार 537, तर उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण ६,232, तर आतापर्यंत 12 हजार 261 इतके रुग्ण बरे झाले आहेत. बुधवारी 15 रुग्णांचा मृत्यू झाला तर आतापर्यंत 435 रुग्ण कोरोनाने दगावले आहेत, अशी माहीती डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली आहे.

तालुकानिहाय आजपर्यंत मिळालेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण :

  • देवगड – 2072,
  • दोडामार्ग – 1094,
  • कणकवली – 4016,
  • कुडाळ – 3552,
  • मालवण – 2148,
  • सावंतवाडी – 2666,
  • वैभववाडी – 982,
  • वेंगुर्ले – 1587,
  • जिल्हय़ाबाहेरील रुग्ण – 122

    तालुकानिहाय सक्रिय रुग्ण :
  • देवगड – 838,
  • दोडामार्ग – 415,
  • कणकवली – 741,
  • कुडाळ – 1005,
  • मालवण – 855,
  • सावंतवाडी – 861,
  • वैभववाडी – 165,
  • वेंगुर्ले – 587,
  • जिल्हय़ाबाहेरील – 70

    तालुकानिहाय आतापर्यंतचे एकूण मृत्यू :
  • देवगड – 50,
  • दोडामार्ग – 12,
  • कणकवली – 94,
  • कुडाळ – 71,
  • मालवण – 61,
  • सावंतवाडी – 75,
  • वैभववाडी – 39,
  • वेंगुर्ले – 31,
  • जिल्हय़ाबाहेरील रुग्ण – २ अशी आतापर्यंतची मृतांची संख्या आहे.

    जिल्ह्यात मृत्यूच्या संख्येत वाढ

जिल्ह्यात आणखी 15 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामध्ये मालवण येथील 47 वर्षीय महिला, वेंगुर्ले-परुळे येथील 56 वर्षीय पुरुष, कुडाळ-डिगस येथील 75 वर्षीय पुरुष, देवगड-वळिवंडे येथील 70 वर्षीय महिला, मालवण-बेलाचीवाडी येथील 16 वर्षीय महिला, कणकवली-नाटळ येथील 62 वर्षीय पुरुष, सावंतवाडी-बांदा येथील 34 वर्षीय पुरुष, कुडाळ-पिंगुळी येथील 40 वर्षीय पुरुष, सावंतवाडी येथील 81 वर्षीय महिला, वेंगुर्ले-उभादांडा येथील 75 वर्षीय महिला, कुडाळ-ओरोस येथील 42 वर्षीय पुरुष, कणकवली-वागदे येथील 72 वर्षीय पुरुष, वेंगुर्ले-उभादांडा येथील 65 वर्षीय पुरुष, सावंतवाडी-माजगाव येथील 54 वर्षीय पुरुष, कुडाळ-आकेरी येथील 72 वर्षीय महिला यांचा समावेश आहे. कणकवली तालुक्यात आतापर्यंत झाले सर्वाधिक मृत्यू

हेही वाचा -'माध्यमांवर आवर घाला' म्हणत दाखल केली याचिका; उच्च न्यायालय म्हणाले 'रिमोट तर तुमच्याच हातात'

ABOUT THE AUTHOR

...view details