महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिंधुदुर्गात अस्वलाच्या हल्यात शेतकरी गंभीर जखमी - अस्वल हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

चिखलव्हाळ परिसरात अचानक अस्वल आले आणि त्यांनी नाईक यांच्यावर हल्ला चढविला. त्यावेळी त्यांचा आरडाओरड ऐकून बाजूला शेतात काम करीत असलेल्या अन्य शेतकर्‍यांनी धाव घेतली. तोपर्यंत नाईक यांना गंभीर दुखापत झाली होती.

सिंधुदुर्गात अस्वलाच्या हल्यात शेतकरी गंभीर जखमी
सिंधुदुर्गात अस्वलाच्या हल्यात शेतकरी गंभीर जखमी

By

Published : Oct 30, 2020, 8:14 PM IST

सिंधुदुर्ग- अस्वलाने केलेल्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाल्याचा प्रकार सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ बेरडकी चिखलव्हाळ (थोरलामाळ) येथे घडला आहे. नागेश रीमू नाईक (वय ५२) असे त्यांचे नाव आहे. जखमी नाईक यांना अधिक उपचारासाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

चौकुळ बेरडकी येथे राहणारे नाईक हे आपली गुरे चरवण्यासाठी चिखलव्हाळ परिसरात गेले होते. दरम्यान, त्या ठिकाणी अचानक अस्वल आले आणि त्यांनी नाईक यांच्यावर हल्ला चढविला. त्यावेळी त्यांचा आरडाओरड ऐकून बाजूला शेतात काम करीत असलेल्या अन्य शेतकर्‍यांनी धाव घेतली. तोपर्यंत नाईक यांना गंभीर दुखापत झाली होती. मात्र, सर्वांनी त्या ठिकाणी धाव घेतल्यानंंतर अस्वलाने पळ काढला.

आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार

दरम्यान, जखमी नाईक यांना तत्काळ १०८ रुग्णवाहिकेच्या साहाय्याने चालक अर्जुन राऊत यांनी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यासाठी मोहन नाईक, पुंडलिक नाईक, लक्ष्मण नाईक आदींनी त्यांना सहकार्य केले. यावेळी आंबोली प्राथमिक रुग्णालयात डॉ. महेश जाधव आणि अदिली पालकर यांनी त्यांच्यावर उपचार केले. हल्ल्याची माहिती कळल्यानंतर वनपाल वसंत चाळके, अमोल पाटेकर, गोरख भिंगारदिवे, बाळा गावडे, मंगेश नाटेकर आदींनी त्या ठिकाणी धाव घेतली.

आंबोली नांगरतास परिसरात टस्कर हत्तीने पाठलाग केल्याची घटना ताजी असताना आणखी हा एक प्रकार घडल्याने ग्रामस्थांमध्ये रानटी जनावरांबाबत भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे त्यांचा योग्य तो बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details