सिंधुदुर्ग -वेंगुर्ला तुळस राऊळवाडा येथील महेश राऊळ यांना कॅस्ट्रो कोरल स्नेक ( Castro Coral Snake ) ज्याला मराठीमध्ये पोवळा साप ( Povla Snake ) असे म्हटले जाते ही अतिशय दुर्मिळ सापाची प्रजाती ( Very rare snake species ) आढळून आली आहे. सिंधुदुर्गमध्ये केवळ दुसऱ्यांदा या सापाची नोंद झाली असल्याचे वन्य प्राणी अभ्यासक हेमंत ओगले ( Wildlife researcher Hemant Ogle ) यांनी सांगितले आहे.
दुर्मिळ सापाची प्रजाती आढळली -
पश्चिम घाटामध्ये सिंधुदुर्गची जैवविविधता ही अतिशय श्रीमंत समजली जाते आणि याच श्रीमंतीची अनेक उदाहरणे आपल्यासमोर नेहमी आपण बघत आलो आहोत. अलिकडेच आढळलेला काळा बिबटा असेल किंवा पट्टेरी वाघांचे अस्तित्व असेल त्यात भर म्हणून वेंगुर्ले तालुक्यातील तुळस राऊळवाडा येथील प्राणीमित्र महेश राऊळ ( Animal friend Mahesh Raul ) यांना कॅस्ट्रो कोरल स्नेक ज्याला मराठीमध्ये पोवळा साप असे म्हटले जाते ही अतिशय दुर्मिळ सापाची प्रजाती आढळून आली आहे.
सिंधुदुर्गात केवळ दुसऱ्यांदा या सापाची झाली नोंद -
महेश राऊळ हे गेली अनेक वर्ष भरवस्तीत आलेले साप पकडुन जंगलात सोडतात ते परिसरामध्ये सर्पमित्र म्हणून सुपरिचित आहेत. त्याशिवाय भटके प्राणी असतील किंवा वन्यप्राणी जखमी प्राणी यांच्यावर उपचार करण्यासाठी सुद्धा महेश राऊळ नेहमी अग्रस्थानी असतात. असेच काम करत असताना त्यांना घराच्या शेजारी हा साप आढळून आला. त्यांनी तत्काळ आपले सहकारी वैभव अमृसकर आणि कोकण वाइल्डलाइफ रेस्क्यू फोरमचे अध्यक्ष अनिल गावडे यांना संपर्क केला. या तिघांनी शहानिशा केल्यानंतर त्यांना लक्षात आले की हा साप संपूर्ण पश्चिम घाटामध्ये प्रदेशनिष्ठ असून अतिशय दुर्मिळ असा आहे हा साप पाहण्यासाठी सर्पमित्र भटकत असतात किंवा हा साप दिसावा म्हणून संशोधनही केले जाते. सिंधुदुर्गमध्ये केवळ दुसऱ्यांदा या सापाची नोंद झाली असल्याचे वन्यप्राणी अभ्यासक हेमंत ओगले यांनी सांगितले आहे. हेमंत ओगले यांनी या सापाचे संशोधन केले आहे.