महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिंधुदुर्गात पुन्हा एकदा राबवली जाणार हत्ती पकड मोहीम - sindhudurg latest elephant news

मागच्या वेळी राबवण्यात आलेल्या हत्ती हटाव मोहीमेच्या पथकाची यावेळी मदत घेतली जाणार आहे. एका हत्तीमागे तीस लाख रुपये, असा खर्च अपेक्षित आहे. सध्या दोडामार्ग भागात रानटी हत्तींनी लोकांमध्ये मोठी दहशत निर्माण केली आहे.

Elephant capture campaign to be conducted once again in sindhudurg
सिंधुदुर्गात पुन्हा एकदा राबवली जाणार हत्ती पकड मोहीम

By

Published : Jul 7, 2020, 6:26 PM IST

सिंधुदुर्ग - कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात रानटी हत्तींना पकडण्यासाठी दोन्ही वनविभागाकडून पुन्हा एकदा हत्ती हटाव मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहीमेचे नियोजन झाले असून हा प्रस्ताव नागपूर कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 4 आणि कोल्हापूरात स्थिरावलेले 10, असे मिळून एकूण 14 हत्तींचा यात समावेश आहे.

सिंधुदुर्गातात 'हत्तीसंकट'

मागच्या वेळी राबवण्यात आलेल्या हत्ती हटाव मोहीमेच्या पथकाची यावेळी मदत घेतली जाणार आहे. एका हत्तीमागे तीस लाख रुपये, असा खर्च अपेक्षित आहे. सध्या दोडामार्ग भागात रानटी हत्तींनी लोकांमध्ये मोठी दहशत निर्माण केली आहे.

या प्रस्तावाला केंद्र व राज्य शासनाची मान्यता मिळाल्यानंतर ही मोहीम राबवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पकडण्यात आलेले हत्ती तिलारीच्या वरच्या भागातील जंगलात सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी सप्टेबर-ऑक्टोबर महिन्यात ही मोहीम होईल, असा विश्वास वनविभागाच्या अधिकार्‍यांना आहे. जुलैनंतर हे हत्ती पुन्हा चंदगड कोल्हापूरकडे जातील आणि या ठिकाणी त्यांना पकडणे सहज आणि सोपे होईल, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

गेली अनेक वर्षे दोडामार्ग मध्ये स्थिरावलेल्या रानटी हत्तींकडून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान सुरू आहे. या हत्तींनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुसरे टोक गाठले होते. अनेकांना हत्तीमुळे मृत्यूच्या दाढेत जावे लागले होते. त्यानंतर काही प्रमाणात या हत्तींचा त्रास कमी झाला होता. मात्र पुन्हा एकदा 'हत्तीसंकट' डोकावले आहे.

हत्तींच्या उद्रेकामुळे त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी तेथील ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार खासदार विनायक राऊत आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी याबाबत उपाययोजना करणार असल्याचा ग्रामस्थांना शब्द दिला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details