महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 19, 2019, 7:30 PM IST

ETV Bharat / state

विधानसभा निवडणूक : सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रचार तोफा थंडावल्या

राज्यात विधानसभेची निवडणूक होत असून २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. सिंधुदुर्गमध्ये कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या तीन विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूका होत आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रचार तोफा थंडावल्या

सिंधुदुर्ग - महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराच्या तोफा आज (१९ ऑक्टोबर) थंडावल्या. राज्यात २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी सोमवारी २१ ऑक्टोबरला मतदान होत असून प्रत्यक्ष मतदानासाठी आता एकच दिवस शिल्लक राहीला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी यावेळी प्रचारात आघाडी घेत आपआपली शक्ती पणाला लावली होती. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. सोमवारी (ता.२१) सकाळी ७ वाजल्यापासून सायंकाळी ६ यावेळेत मतदानाची प्रक्रीया पार पडणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रचार तोफा थंडावल्या

राज्यात विधानसभेची निवडणूक होत असून २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. सिंधुदुर्गमध्ये कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या तीन विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूका होत आहेत. राज्यात सेना भाजप युती असली तरी सिंधुदुर्गमध्ये मात्र सेना भाजप एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. त्यामुळे परतीच्या पावसाच्या वातावरणात देखील निवडणूक प्रचाराचे वातावरण गरमागरम आहे. जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या बड्या नेत्यांच्या मोठ्या जाहीर सभा झाल्या.

हेही वाचा -रत्नागिरी जिल्ह्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या, ठिकठिकाणी उमेदवारांचं शक्तिप्रदर्शन

जिल्ह्यात काँग्रेस कडूनही खासदार हुसेन दलवाई आणि इतर नेत्यांना प्रचारासाठी उतरवले गेले. त्यामुळे एकंदर वातावरण चांगलेच तापले होते. उमेदवारांनी वाड्या वस्त्यांवर जात घरोघरी प्रचार केला. बाजारपेठांमधून प्रचार रॅली, बाईक रॅली याव्दारे ही मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न उमेदवारांनी केला. मात्र, ही प्रचाराची धुळवड आज संध्याकाळ पासून शांत झाली आहे. आता सर्वांनाच मतदानाचे वेध लागले असून सोमवारी (ता.२१) सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदानासाठी वेळ देण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेच्या ४८ तास अगोदर जाहीर प्रचार बंद होतो. त्याप्रमाणे शनिवारी सायंकाळी ६ वाजता जाहीर प्रचार बंद झाला आहे.

हेही वाचा - ऱणधुमाळी विधानसभेची : आमदार प्रणिती शिंदे साधणार का हॅटट्रिक?

निवडणूक प्रक्रीया यशस्वी पणे राबविण्यासाठी प्रशासन ही सज्ज असून निवडणूक यंत्रणेची तयारी ही अंतिम टप्प्यात आली आहे. निवडणुकीठी ४ हजार ३० कर्मचारी यापूर्वीच नियुक्त करण्यात आले आहेत. तर ९१६ मतदान केंद्रांवर मतदान होणार असल्याने मतदान यंत्रे ही प्रत्येक विधानसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयापर्यंत पोहच करण्यात आली आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details