सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 10 लाख रुपयांची मदत दिली आहे. या मदतीचे धनादेश आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सावंतवाडीचे तहसिलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांनी दिला मुख्यमंत्री सहायता निधीला मदतीचा हात - sindhudurg corona update
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 10 लाख रुपयांची मदत दिली आहे. या मदतीचे धनादेश आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सावंतवाडीचे तहसिलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
'या' शिक्षण संस्थांनी केली मदत -
शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी यांनी 21 हजार रुपये, पंचम खेमराज महाविद्यालयाने 2 लाख 11 हजार 977 रुपये, एस. के. पाटील महाविद्यालयाने 62 हजार 154 रुपये, महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेने 1 लाख 2 हजार 536, आर्ट्स व कॉमर्स महाविद्यालय फोंडाकडून 38 हजार 845, एस. एच. केळकर महाविद्यालयाने 1 लाख 81 हजार 730, कणकवली महाविद्यालयाने 1 लाख 5 हजार 166, बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाने 1 लाख 33 हजार 465, संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ तर्फे 1 लाख 32 हजार 359 रुपये, लक्ष्मीबाई सी. हळबे महाविद्यालयाने 24 हजार 775, रावसाहेब गोगटे महाविद्यालय 59 हजार 570 रुपये या प्रमाणे एकूण 10 लाख 73 हजार 577 रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात आला आहे.