सिंधुदुर्ग- शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ पाट येथील अल्पेश घारे या युवा चित्रकाराने अनोखी मानवंदना दिली आहे. अल्पेशने निवतीच्या विस्तीर्ण समुद्र किनाऱ्यावर भले मोठे चित्र साकारले आहे. किनाऱ्यावरील वाळू आणि रांगोळी वापरून चित्र साकारून बाळासाहेबांना अनोखी मानवंदना दिली.
सिंधुदुर्गात बाळासाहेब ठाकरेंना आगळ्या-वेगळ्या कलाकृतीतून मानवंदना - सिंधुदुर्ग समुद्र किनाऱ्यावर बाळासाहेब ठाकरेंचे चित्र
समुद्र किनाऱ्यावर ३० फुटाच्या चौरसात बाळासाहेबांचे भले मोठे चित्र साकारले आहे. किनाऱ्यावरील वाळू आणि रांगोळीचा वापर करून हूबेहूब चित्र साकारून बाळासाहेबांना अनोखी मानवंदना दिली आहे.

समुद्र किनाऱ्यावर ३० फुटाच्या चौरसात बाळासाहेबांचे भले मोठे चित्र साकारले आहे. किनाऱ्यावरील वाळू आणि रांगोळीचा वापर करून हूबेहूब चित्र साकारून बाळासाहेबांना अनोखी मानवंदना दिली आहे.
२३ जानेवारी हा मराठी मातीशी नाते घट्ट करणारा दिवस. यापुढे हा दिवस उजाडणार तो पूर्वेच्या भगव्या क्षितीज्यावर बाळासाहेबांचे नाव कोरून. एक कलाकार म्हणून बाळासाहेबांचे जे दर्शन होते ते सामान्य कलाकाराला खूप भावते. ते नेहमीच महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसांसाठी झगडले. त्यांना जन्मदिनी अनोख्या पद्धतीने मानवंदना द्यावी असा माझा विचार होता. त्यातूनच हे चित्र मी साकारले आहे. हे चित्र साकारायला मला दीड तासाचा अवधी लागला, असे यावेळी अल्पेश घारे याने सांगितले.
वाळू आणि रांगोळी या नाविन्यपूर्ण माध्यमाचा केला वापर
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सर्वांच्या मनात, स्पंदनात, हृदयात आजही अमर आहेत. त्यांना मानवंदना देण्याकरिता या कलाकृतीची अल्पेश याने निर्मिती केली आहे. कलाकार वेगवेगळ्या क्लृप्त्या करून कलाकृती साकार करीत असतो. पण अल्पेश घारे या कलाकाराने एका कलाकाराला आगळी-वेगळी मानवंदना दिली. वाळू आणि रांगोळी या नाविन्यपूर्ण माध्यमाचा त्याकरिता वापर केला आहे. विशेष म्हणजे शूटिंग करण्यासाठी ड्रोनचा वापर केलेला नाही, ३० फुटाच्या चौरसात चित्र साकारले आहे. या चित्राचे आमदार, खासदार यांनीही कौतुक केले.
TAGGED:
सिंधुदुर्ग बातम्या