सिंधुदुर्ग- कोरोना विषाणूचा भारतामध्ये शिरकाव झाल्यापासपून 'सोशल डिस्टन्स' हा शब्द रोज सकाळपासून रात्रीपर्यंत रेडिओ आणि टेलिव्हिजनवर ऐकायला मिळत आहे. तर 'हिंदुस्थान को बचाने के लिये सोशल डिस्टन्स यही एक रास्ता है', हे वाक्य आपल्याला फार काळजीत टाकणारे आहे. कारण, 'सोशल डिस्टन्स' हा अस्पृश्यतेचा पाया आहे, असे मत प्रसिद्ध भाषा तज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केले आहे. समता प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आयोजित सत्यशोधक व्याख्यानमालेत ते बोलत होते.
'सोशल डिस्टन्स' हा शब्द काळजीत टाकणारा - डॉ. गणेश देवी
कोरोनाच्या जागतिक संकटामुळे ही नियोजित व्याख्यानमाला फेसबुक लाइव्हच्या माधमातून घेण्यात आली. यावेळी गणेश देवी यांचे 'जात अस्पृश्यता आणि आजचे वर्तमान' या विषयावर हे व्याख्यान झाले.
कोरोनाच्या जागतिक संकटामुळे ही नियोजित व्याख्यानमाला फेसबुक लाइव्हच्या माधमातून घेण्यात आली. यावेळी गणेश देवी यांचे 'जात अस्पृश्यता आणि आजचे वर्तमान' या विषयावर हे व्याख्यान झाले.
यावेळी डॉ. गणेश देवी पुढे म्हणाले, जातव्यवस्था समाजातून जात नाही, याची चिंता आपल्याला सर्वांना आहे आणि ही व्यवस्था अशीच राहिलेली आपल्याला नडत आलेली आहे. आज कोरोनामुळे पुन्हा एकदा मनुस्मृती सुरु करण्याचा घाट घातला जात आहे. सोशल डिस्टन्स हा शब्द काळजीत टाकणारा आहे, कारण सोशल डिस्टन्स हा अस्पृश्यतेचा पाया आहे. आणि अस्पृश्यतेच्या विरुद्ध आपल्या देशात अनेक महान विचारकांनी, समाज सुधारकांनी अनेक वर्षे संघर्ष केला आहे. या संघर्षाचा अंत आपल्याला परत आणून द्यायचा का? अस्पृश्यतेला हरवायचं ? असा सवाल डॉ. देवी यांनी उपस्थित केला.