सिंधुदुर्ग - फेसबुकवर मालवण येथील डॉ. विवेक रेडकर आणि वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांबद्दल बदनामीकारक व चिथावणीखोर पोस्ट टाकणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध म्हणून सिंधुदुर्गातील डॉक्टरांनी काळी फीत लावून आंदोलन सुरू केले आहे. सिंधुदुर्गात सुरु असलेल्या या आंदोलनाला १०० टक्के प्रतिसाद मिळाला आहे.
सोशल मीडियावर डॉक्टरांची बदनामी; काळी फीत लावून निषेध - sindhudurg updates
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वतःचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय सेवा देणाऱ्यांना ठेचून मारण्याची धमकी देणाऱ्या प्रवृत्तीबद्दल वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये तीव्र संताप आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वतःचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय सेवा देणाऱ्यांना ठेचून मारण्याची धमकी देणाऱ्या प्रवृत्तीबद्दल वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये तीव्र संताप आहे. अशा प्रवृत्तीचा प्रशासनाने योग्य वेळी बंदोबस्त करावा व कायद्याच्या माध्यमातून शिक्षा द्यावी अशी मागणी होत आहे.
आज सुरू असलेल्या आंदोलनामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन(IMA), डॉक्टर्स फॅटर्निटी क्लब(DFC),असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया, सर्जन असोसियएशन ऑफ इंडिया, पॅरा मेडिकल स्टाफ यांचा समावेश आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्ह्यातील अत्यावश्यक वैद्यकीय सेवा सुरू ठेवली आहे. समाजातील अशा प्रवृत्तीवर जिल्हा प्रशासन काय कारवाई करते याकडे वैद्यकीय व्यावसायिकांचे लक्ष लागून राहिले आहे.