सिंधुदुर्ग - आमदार नितेश राणे यांची अटकपूर्व जामीन अर्जाची फेरविचार याचिका जिल्हा न्यायालयाने फेटाळली आहे. ( Supreme Court On Nitesh Rane ) जिल्हा न्यायाधीश आर. बी रोटे यांनी ही याचिका फेटाळली आहे. संतोष परब हल्ल्याच्या गुन्ह्यात ( Santosh Parab Attack Case ) सर्वोच्च न्यायालयाने आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला ( Supreme Court On Nitesh Rane ) होता. त्यानंतर शुक्रवारी नितेश राणे यांनी जिल्हा न्यायालयात शरण येत जामीनासाठी फेरविचार याचिका दाखल केली होती. हा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर उद्या (2 फेब्रुवारी) सुनावणी होण्याची शक्यता आहे.
- आमदार नितेश राणे जाणार मुंबई उच्च न्यायालयात
आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्जावरील फेरविचार याचिका जिल्हा न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे नितेश राणे हे पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. दरम्यान, नितेश राणे यांनी शरण न येता जामिनावरील फेरविचार याचिका दाखल केल्याने त्यांचा हा अर्ज फेटाळण्यात आला असल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली आहे. आमदार नितेश राणे हे कणकवलीतील आपल्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.
कणकवली शहरातील नरडवे फाटा येथे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबरला हल्ला झाला होता. या प्रकरणी आमदार राणे २८ जानेवारीला जिल्हा न्यायालयात हजर झाले. त्यांनी नियमित जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला. तो अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करून घेण्यात आला. न्यायाधीश रोटे यांनी यावर प्राथमिक युक्तिवाद ऐकून घेतला. आज सकाळी ११ वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत सुनावणी चालली. सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील घरत, भूषण साळवी यांनी आमदार राणे यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. बचाव पक्षाच्यावतीने बाजू मांडताना सतीश मानशिंदे यांनी आमदार राणे यांना जामीन मिळावा यासाठी युक्तिवाद केला. त्यांना वकील संग्राम देसाई, राजेंद्र रावराणे, राजेश परुळेकर यांच्यासह अन्य वकिलांच्या पथकाने साथ दिली.
- न्यायालयाच्या निर्देशानुसार यंत्रणा काम करेल - सामंत
चारवेळा सुनावणी झाली. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा सन्मान करायला हवा. न्यायालयाने जे काही निर्णय दिलेला आहे त्याच्या आधीन राहून संबंधित यंत्रणा काम करतील, युक्तिवाद आता संपलेला आहे त्यावर न्यायालयाने निर्देश दिले आहेत. बाहेरच्या निकालाचं संबंधित यंत्रणा तंतोतंत पालन करेल, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
- आमदार नितेश राणे यांची गाडी पोलिसांनी अडवली -
आमदार नितेश राणे यांची गाडी पोलिसांनी अडवली. न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ते जात असताना पोलिसांनी त्यांच्या समोर आपल्या गाड्या लावल्या. यामुळे वातावरण तणावाचे झाले होते. यावेळी माजी खासदार निलेश राणे आक्रमक झाले होते. थांबवण्याचे आदेश दाखवा अशी त्यांनी पोलिसांकडे मागणी केली. यावेळी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते.
- नितेश राणे पुन्हा न्यायालय इमारतीत दाखल
यानंतर गाडीतून उतरत आमदार नितेश राणे पुन्हा न्यायालय इमारतीत जाऊन बसले. जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर नितेश राणे वाहनांसह घरी निघालेले असताना पोलिसांनी आपली वाहने समोर लावत त्यांना घेराव घातला होता. यानंतर माजी खासदार निलेश राणे यांनी तुम्ही कोणत्या नियमात अडवले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दहा दिवस दिलासा दिला आहे. जर तुम्ही अडवत असाल तर आदेश दाखवा, अशी मागणी पोलिसांकडे केली. यावेळी पोलीस निरुत्तर झाले. त्यानंतर त्यांचे वकील संग्राम देसाई व सतीश मानशिंदे पुन्हा नितेश राणे असलेल्या ठिकाणी आले व त्यांना जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत पुन्हा घेऊन गेले.
- नितेश राणे यांचे वकील म्हणाले...
यानंतर पुन्हा एकदा आमदार नितेश राणे यांच्यासह त्यांचे दोन्ही वकील बाहेर आले. यावेळी बोलताना सतीश मानशिंदे म्हणाले, पोलिसांनी नितेश राणे यांना अडवल्याचे आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने त्यांना सर्वोच्च न्यायालयाने राणे यांना दहा दिवसाची मुदत दिली असल्याने अटक करता येणार नसल्याचे सांगितले. पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे, त्यांची ही दादागिरी असून आम्ही ती न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊ, असे ते म्हणाले.
- सरकारी वकील म्हणाले...
सरकारी वकील प्रदीप घरत यावेळी बोलताना म्हणाले, नितेश राणे हे न्यायालयाला रीतसर शरण न येता त्यांनी आपल्या अटकपूर्व जामीन अर्जावर फेरवचार करावा अशी याचिका न्यायालयात दाखल केली होती. ते न्यायालयात शरण न आल्याने या याचिकेवर या न्यायालयात सुनावणी होऊ शकत नाही, असे कारण देत न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला आहे.
- नियमित जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज
कणकवली शहरातील नरडवे फाटा येथे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबरला हल्ला झाला होता. या प्रकरणी आमदार राणे २८ जानेवारीला जिल्हा न्यायालयात हजर झाले. (( Nitesh Rane Bail Hearing )) त्यांनी नियमित जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला. तो अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करून घेण्यात आला.
- राणे यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी