सिंधुदुर्ग -माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांचा अभिनंदन ठराव, त्यांनी आणलेला निधी आणि त्याचे वाटप या विषयावरून शिवसेना आमदार वैभव नाईक आणि आमदार नितेश राणे यांच्यात शाब्दीक चकमक झाली. याविषयावरून सदस्यांनीही गोंधळ घातला. खासदार नारायण राणे व पालकमंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीनंतर हा वाद थांबला.
दीपक केसरकरांच्या अभिनंदन ठरावावरून वैभव नाईक अन् नितेश राणेंमध्ये वाद
सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आमदार वैभव नाईक आणि आमदार नितेश राणेंमध्ये शाब्दीक खडाजंगी झाली. तसेच दोन्ही पक्षांच्या सद्स्यांनीही गोंधळ घातला.
नियोजन समिती सभेच्या सुरुवातीला आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. याला खासदार नारायण राणे यांनी अनुमोदन दिले. माजी पालकमंत्री व शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी आपल्या पालकमंत्री पदाच्या कारकिर्दीत सर्वाधिक निधी आणला. त्यामुळे आमदार वैभव नाईक यांनी केसरकरांच्या अभिनंदनाचा ठराव वैभव नाईक यांनी मांडला. यावर दीपक केसरकर यांनी गेल्या पाच वर्षात विकासाचे राजकारण केल्याचा आरोप आमदार राणे यांनी केला. यावेळी शाब्दीक खडाजंगी झाली. तसेच दोन्ही बाजूच्या सदस्यांनीही गोंधळ घातला.
हे वाचलं का? - 'आव्हान म्हणून स्वीकारल्यास डॉ.आंबेडकरांचे स्मारक दोन वर्षात होणार पूर्ण'