रत्नागिरी -सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण नाक्यावर वनविभागाकडून ( Sindhudurga Forest Department ) लाकडानं भरलेल्या गाड्या सोडण्यासाठी नियमबाह्य पैसे मागितले जात असल्याचा व्हिडीओ ( Kharepatan Naka ) सध्या समोर आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा येथील लाकूड व्यापारी असलेले राजेश कोलपटे यांनी या व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये नियमानुसारदेखील पैसे भरल्यास वनविभागाचा तपासणी नाक्यावरील अधिकारी एक गाडी सोडण्यासाठी किमान 1500 हजार रूपये घेतो. शिवाय, पासची देखील राजरोसपणे विक्री करतो असा आरोप केला आहे.
एक गाडीसाठी किमान 1500 हजार रूपये -
रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा येथील लाकूड व्यापारी असलेले राजेश कोलपटे यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये नियमानुसारदेखील पैसे भरल्यास वनविभागाचा तपासणी नाक्यावरील अधिकारी एक गाडी सोडण्यासाठी किमान 1500 हजार रूपये घेत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच आम्ही नियमानुसार पैसे भरतो त्यानंतर देखील आम्ही पैसे का द्यायचे? असा सवाल व्यापाऱ्यानं केला आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील पासवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाड्यांचा नंबर टाकत रत्नागिरी जिल्ह्यातील लाकूड तोडीनंतर मालवाहतुकीस मिळणारे पास त्या ठिकाणी वापरले जात असल्याचा गंभीर आरोप देखील व्यापाऱ्यानं केला आहे.