महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिंधुदुर्गमध्ये मोठ्या उत्साहात दिवाळी पहाट साजरी...

नरकासुराच्या सान्निध्यात वेळ घालवल्याने युवकांच्या मनावर अयोग्य संस्कार बिंबतात. हे टाळण्यासाठी समाजाने भगवान श्रीकृष्णाचा आदर्श घ्यावा आणि दीपावलीचा अध्यात्मिक शास्त्रीय लाभ सर्वांना व्हावा, या हेतूने कसाल ग्रामस्थांनी रविवारी सकाळी श्रीकृष्ण प्रतिमा फेरी काढली. यावेळी नरकासुर दहन न करता श्रीकृष्णाचा पूजन करण्यात आले. यातून वेगळा संदेश देण्यात आला.

By

Published : Oct 28, 2019, 4:55 PM IST

सिंधुदुर्गमध्ये दिवाळी पहाट साजरा...

सिंधुदुर्ग -जिल्ह्यातील कसाल ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या उत्साहात दिवाळी पहाट साजरी करण्यात आली. नरकासुर दहनाऐवजी समाजाने भगवान श्रीकृष्णाचा आदर्श घ्यावा आणि दीपावलीचा अध्यात्मिक शास्त्रीय लाभ सर्वांना व्हावा, या हेतूने हा कार्यक्रमाचा उद्देश्य असल्याचे गजानन मुंज यांनी सांगितले. रविवारी दिवाळीच्या दिवशी पहाटे दिवशी सकाळी श्रीकृष्ण प्रतिमा फेरी काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सिंधुदुर्गमध्ये दिवाळी पहाट साजरा...

हेही वाचा -हिंगोलीत परतीच्या पावसाचा धुमाकुळ, कपाशीला मोठा फटका

सध्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये नरकासुर प्रतिमास्पर्धांचे आयोजन आणि नरकासूर दहन प्रथेतील अपप्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. प्रत्यक्षात सत्प्रवृत्तीचा दुष्प्रवृत्तीवर विजय म्हणून नरकचतुर्दशी साजरी केली जाते. भगवान श्रीकृष्णाने भक्तांचा छळ करणाऱ्या नरकासुराचा वध करून भक्तांचे रक्षण केले. याचा विसर पडलेला आहे. मात्र, काळाच्या ओघात ज्याचा वध केला, त्याच नरकासुराचा उदोउदो होताना दिसतो.

हेही वाचा -राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याचा पराभव होताच शिवसेनेत प्रवेश

नरकासुराच्या सान्निध्यात वेळ घालवल्याने युवकांच्या मनावर अयोग्य संस्कार बिंबतात. हे टाळण्यासाठी समाजाने भगवान श्रीकृष्णाचा आदर्श घ्यावा आणि दीपावलीचा अध्यात्म शास्त्रीय लाभ सर्वांना व्हावा, या हेतूने कसाल ग्रामस्थांनी रविवारी सकाळी श्रीकृष्ण प्रतिमा फेरी काढली. यावेळी नरकासुर दहन न करता श्रीकृष्णाचा पूजन करण्यात आले. यातून वेगळा संदेश देण्यात आला.

हेही वाचा -आमदार बच्चू कडूंनी दिव्यांगांसोबत फटाके फोडून केली दिवाळी साजरी

फेरीचा प्रारंभ येथील कसाल कुंभारवाडी इंग्लिश स्कुल येथून करण्यात आला. फेरीच्या मार्गात काही ठिकाणी रिंगण घालून अभंग म्हणण्यात आले. फेरीत लहान मुले मोठ्या प्रमाणात सहभागी झाली होती. या फेरीमध्ये गामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details