सिंधुदुर्ग -मालवण येथील दांडी समुद्रात पॅरासेलिंगला गेलेल्या पर्यटकाचा आज दुपारी तीनच्या सुमारास समुद्रात पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. अझर मनझर अन्सारी (वय ३२), असे मृताचे नाव आहे. साकिनाका येथील अन्सारी दांपत्य पर्यटनासाठी मालवण येथे आले होते .
सेल्फी घेणे बेतले जीवावर; पॅरासेलिंगला गेलेल्या पर्यटकाचा दांडी समुद्रात पडून मृत्यू - पर्यटकाचा दांडी समुद्रात पडून मृत्यू
मालवण येथील दांडी समुद्रात पर्यटक पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. अझर मनझर अन्सारी (वय ३२), असे मृताचे नाव आहे. ही घटना सेल्फीच्या नादात घडल्याचे बोलले जात आहे.
मृत अझर मनझर अन्सारी
हेही वाचा -VIDEO : रस्त्यावर दुचाकी घसरल्यानंतर चालकाला ट्रकने चिरडले, थरार सीसीटीव्हीत कैद
अझर यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. ही घटना सेल्फीच्या नादात घडल्याची चर्चा परिसरात आहे. अझर यांचा मृतदेह विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.
Last Updated : Jan 5, 2020, 11:21 PM IST