महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वेंगुर्ले कालवी बंदर येथे 10 फुटी डॉल्फीन मासा आढळला मृतावस्थेत - मृत डॉल्फीन सिंधुदूर्ग

जिल्ह्यातील वेंगुर्ले कालवी बंदर येथे मोठा डॉल्फीन मासा मृतवस्थेत आढळला आहे. या माशाची लांबी साधारण १० फुट इतकी आहे.

dead-dolphin-found-in-sindhudurg
वेंगुर्ले कालवी बंदर येथे 10 फुटी डॉल्फीन मासा आढळला मृतावस्थेत

By

Published : Apr 20, 2020, 3:15 PM IST

Updated : Apr 20, 2020, 3:37 PM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील वेंगुर्ले कालवी बंदर येथे मोठा डॉल्फीन मासा मृतवस्थेत आढळला आहे. या माशाची लांबी साधारण १० फुट इतकी आहे. सध्या जिल्ह्यात तापमानाने 38 अंशाची सरासरी गाठली असल्याने हा मृत डॉल्फीन कुजण्यास सुरुवात झाली असून त्याची दुर्गंधी परिसरात पसरु लागली आहे.

जिल्ह्याच्या वनविभागाला यासंदर्भात स्थानिकांनी माहिती दिली आहे. मात्र, अजुन कोणीही याची दखल घेतलेली नाही. कालवी बंदर परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. या माशाची योग्यवेळी विल्हेवाट लावली गेली नाही, तर येथील नागरिकांना माशाच्या दुर्गंधीला तोंड द्यावे लागणार आहे.

वेंगुर्ले कालवी बंदर येथे 10 फुटी डॉल्फीन मासा आढळला मृतावस्थेत
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनाऱ्यावर गेल्या दशकभरात डॉल्फिनचे दर्शन होऊ लागल्याने पर्यटन व्यावसायिक सुखावले होते. मात्र मधल्या काळात काही मृत डॉल्फिन समुद्र किनारी लागू लागल्याने नव्या समस्येला येथील पर्यटन व्यावसायिक आणि नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. विशेष म्हणजे समुद्रातून जाणाऱ्या मोठ्या बोटींना आढळल्याने हे डॉल्फिन मृत होत असल्याचे स्थानिक सांगतात.
Last Updated : Apr 20, 2020, 3:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details