सिंधुदुर्ग - तळकोकणात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली होती. परिणामी या ठिकाणी शेकडो हेक्टरवरील भात पिकाचे नुकसान झाले आहे. अशातच वाचलेल्या भातशेतीचेही वन्य प्राणी नुकसान करत आहेत. या नुकसानामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे.
सावंतवाडीच्या मळगावमध्ये गव्यांकडून भातशेतीचे नुकसान, शेतकरी हवालदिल - सिंधुदुर्ग
विशेष म्हणजे गव्यांचा उपद्रव रोखण्यासाठी मळगाव हद्दीवर लाखो रुपये खर्च करून वन विभागाने सौर कुंपण उभारले आहे. मात्र, तरी देखील गवे गावात घुसण्याचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे वनविभाग वन्य प्राण्यांकडून होणारा उपद्रव रोखण्यात अपयशी ठरले आहे.

सावंतवाडीच्या मळगावमध्ये गव्यांकडून भातशेतीची नुकसान
सावंतवाडीच्या मळगावमध्ये गव्यांकडून भातशेतीची नुकसान
सावंतवाडी तालुक्यातील मळगाव रेडकरवाडीत भर वस्तीत गव्यांचा कळप घुसला आहे. या कळपाने परिसरात अक्षरशः धुडगूस घातला आहे. या गव्यांनी येथील भात शेतीला लक्ष करत पीक फस्त केले आहे. तसेच भातशेतीची मोठ्या प्रमाणात नासधूस केली.