सिंधुदुर्ग- संचारबंदीच्या चौथ्या टप्प्यात रेड झोन व नॉन-रेड झोन अशी विभागणी करण्यात आली आहे. नॉन-रेड झोनला राज्य सरकारने संचारबंदीत मोठी शिथिलता दिली आहे. सिंधुदुर्गचा समावेश नॉन-रेड झोनमध्ये होत असल्याने जिल्ह्यात नव्या नियमावलीप्रमाणे शिथिलता देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. मात्र सायंकाळी 7 ते सकाळी 7 या वेळेत संचारबंदी कायम राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्गमध्ये संचारबंदीत शिथिलता; मात्र 'या' वेळेत कर्फ्यू - सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी
नॉन-रेड झोनला राज्य सरकारने संचारबंदीत मोठी शिथिलता दिली आहे. सिंधुदुर्गचा समावेश नॉन-रेड झोनमध्ये होत असल्याने जिल्ह्यात नव्या नियमावली प्रमाणे शिथिलता देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यांतर्गत एसटी बस सुरू करण्यात येणार आहे, मात्र सोशल डिस्टन्स पाळून 50 टक्केच प्रवासी बसवले जाणार आहेत. रिक्षा सुरू करण्यासही परवानगी दिली आहे. मात्र चालक आणि दोनच प्रवासी घेता येणार आहेत. सर्व शासकीय कार्यालये शंभर टक्के सुरू होणार आहेत. बाजारपेठाही सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र सोशल डिस्टन्सचे नियम पाळावे लागणार आहेत. हॉटेल सुरू करण्यास अजून परवानगी दिलेली नाही, मात्र घरपोच सेवा देऊ शकतात. आठवडा बाजार भरवण्याबात अजून आदेश नाहीत, त्यामुळे बाजार तूर्तास बंद राहतील. बाजरापेठा सकाळी 9 ते सायंकाळी 5 वेळेतच सुरू राहणार. रात्रीची संचारबंदी कायम असून याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी पोलिंसाची गस्त सुरू राहणार आहे.
ग्रामीण भागामध्येही गट विकास अधिकारी यांच्यामार्फत लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच मास्क वापरणे बंधनकारक असून न वापरल्यास 200 रुपये दंड केला जाणार आहे. तसेच थुंकल्यास 1000 रुपये दंड केला जाणार आहे. जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांना कन्टेन्मेंट झोन वगळता इतर ठिकणाहून येणाऱ्या सर्वांना घरीच अलगीकरण केले जाणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.