महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिंधुदुर्गात मोरी मासळीची बंपर कॅच, मच्छीमारांमध्ये समाधानाचे वातावरण - मासळी खरेदी न्यूज

किनारपट्टी भागात गेले दोन दिवस मोरी मासळीची चांगली बंपर कॅच मिळाली आहे. श्रावण संपल्याने मोरी मासळीच्या खरेदीसाठी मत्स्य खवय्यांनी आज समुद्रकिनारी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले.

मासळी
मासळी

By

Published : Aug 19, 2020, 3:35 PM IST

सिंधुदुर्ग - किनारपट्टी भागात गेले दोन दिवस मोरी मासळीची चांगली बंपर कॅच मिळाली आहे. श्रावण संपल्याने मोरी मासळीच्या खरेदीसाठी मत्स्य खवय्यांनी आज समुद्रकिनारी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. सकाळच्या सत्रात २५० रुपये किलो मोरीचा दर ३०० रुपयांपर्यंत वधारला होता. गतवर्षीच्या मासेमारी हंगामात म्हणावी तशी मासळीची कॅच मिळाली नाही. त्यामुळे मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली.

पर्ससीन, हायस्पीड ट्रॉलर्सची घुसखोरी, एलईडीची विध्वंसकारी मासेमारीमुळे स्थानिक मच्छीमारांच्या जाळ्यात मासळीच मिळत नव्हती. कोरोनाच्या संकटाचा फटका मासेमारी हंगामास बसल्याचे दिसून आले. कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक घडी बिघडल्याने मच्छीमारांच्या चिंतेत आणखीनच वाढ झाल्याचे दिसून आले.

नव्या मासेमारी हंगामाची दमदार सुरुवात होईल, अशी अपेक्षा मच्छीमार बाळगून होते. १ ऑगस्टपासून मासेमारी हंगामास सुरुवात झाली. मात्र, वादळी वारे, अतिवृष्टीमुळे मासेमारीस सुरुवात झाली नाही. मात्र, गेल्या काही दिवसात स्थानिक मच्छीमारांना बांगडा, पेडवे, पापलेट, मोरी यासारखी किरकोळ मासळीचे उत्पन्न मिळत होते. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी मासळीची चांगली कॅच मिळेल अशी मच्छीमारांना आशा होती. यातच गेल्या दोन दिवसात मच्छीमारांना मोरी मासळीची मोठी कॅच मिळाल्याने त्यांच्यात समाधानाचे वातावरण आहे. मोरीची आवक वाढल्याने ५०० ते ५५० रुपये किलो दराने मिळणाऱ्या मोरीच्या दरात घसरण झाल्याचे दिसून आले.

श्रावण संपल्याने येत्या गणेशोत्सवापूर्वी मासळीचा आस्वाद लुटण्यासाठी मत्स्यखवय्यांनी आज समुद्रकिनारी गर्दी केल्याचे दिसून आले. सकाळी २५० रुपये किलो मोरीचा दर ३०० रुपये किलोपर्यंत वधारल्याचे दिसून आले.

सध्या पर्यटन व्यवसाय बंद असल्याने मासळीची मागणी म्हणावी तशी नाही. त्यामुळे दरात मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. मासळीची चांगली कॅच मिळाल्याने मच्छीमारांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे दिसून आले. दरम्यान, या बंपर मासळीचा धमाका खरेदी करण्यासाठी अनेकांनी समुद्रकिनारी मोठी गर्दी केली होती. यावर्षी मासळी हंगामाने चांगली सुरवात केली आहे. त्यामुळे मासेमार वर्गातही समाधानाचे वातावरण आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details