सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील काजू बागायतदारांच्या घरात कोट्यवधी रूपये किंमंतीची काजू बी खरेदी न झाल्याने पडून आहे. कमीत कमी १२० रूपये प्रती किलोला दर मिळेल, या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. त्यातच पावसाळा सुरु झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोट्यवधीचे काजू बी पडून, शेतकऱ्यांची चिंता वाढली - काजू शेतकरी न्यूज
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू बागायतदारांची चिंता वाढली आहे. कारण कोट्यवधी रूपये किंमंतीची काजू बी खरेदी न झाल्याने पडून आहेत. कमीत कमी १२० रूपये प्रती किलोला दर मिळेल, या प्रतीक्षेत शेतकरी आहेत.
![सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोट्यवधीचे काजू बी पडून, शेतकऱ्यांची चिंता वाढली Crores of cashew seeds fell in Sindhudurg district](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7606547-122-7606547-1592064745403.jpg)
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोट्यवधीची काजू बी पडून
जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे अर्थकारण काजू बागांवर अवलंबून आहे. गेल्या दहा वर्षात कजू लागवडीच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली. दरवर्षी ५ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते. मागील काही वर्षात काजूला चांगला दर देखील मिळाला. त्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांनी काजू लागवडीत रस दाखवला. काजू हे एकमेव पीक संपूर्ण जिल्ह्यात घेतले जाते. १ हजार २०० ते १ हजार ५०० कोटी इतकी काजूपासून आर्थिक उलाढाल होते.