सिंधुदुर्ग -जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत एकूण 407 नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या सर्व नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी 405 नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. सध्या जिल्हा रुग्णालयाकडून पाठवण्यात आलेल्या एकाही नमुन्याचा अहवाल येणे शिल्लक नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयात विलगीकरण कक्षामध्ये सध्या 37 व्यक्ती दाखल असून त्यातील 26 व्यक्ती या डेडिकेटेड कोविड रुग्णालयामध्ये तर 11 व्यक्ती या डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये दाखल आहेत. आज रोजी आरोग्य विभागामार्फत एकूण 2383 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.
नागरिकांसाठी ऑनलाईन ओपीडीची सुविधा :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांसाठी आरोग्य विभागाचे esanjeevaniopd.in हे ॲप तयार करण्यात आले आहे. आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करून ही वेबसाईट सुरू करता येते. या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन ओपीडी, प्राथमिक उपचारविषयक मोफत मार्गदर्शन मिळणार आहे. सध्या या वेबसाईटचा लाभ जिल्ह्यातील 183 व्यक्तींनी घेतला आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
हेही वाचा...तीन तारखेनंतर अधिक मोकळीक मिळणार, निर्बंध शिथिल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत, पण...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती :
- घरीच क्वारंटाईन करण्यात आलेले नागरिक - 272
- संस्थात्मक क्वारंटाईन नागरिक - 140
- कोरोना चाचणीसाठी पाठवण्यात आलेले एकूण नमुने - 407
- कोरोना चाचणीचा अहवाल प्राप्त झालेले नमुने - 407
- आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह नमुने - 2
- आतापर्यंत कोरोना निगे
टिव्ह नमुने - 405 - अहवाल प्राप्त न झालेले नमुने - 00
- विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण - 37
- सध्यस्थितीत जिल्ह्यातील पॉझि
टिव्ह रुग्ण - 01 - आज रोजी तपासणी करण्यात आलेल्या व्यक्ती - 2383