महाराष्ट्र

maharashtra

गोव्यात परदेशी नागरिकांचेही कोरोना लसीकरण, उत्तम प्रतिसाद

By

Published : Aug 7, 2021, 3:34 PM IST

गोव्यात परदेशी नागरिकांसाठीही कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात काम करणाऱ्या विशेषतः नेपाळी, चिनी नागरिकांसह अनेक परदेशी नागरिकांनी सकाळपासून कोविड लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी एकच गर्दी केल्याचे दिसले.

goa
goa

पणजी -राज्य सरकारने राज्यातील जनतेचे जुलै अखेरपर्यंत 100 टक्के कोविड लसीकरणचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र 90 टक्के लोकांनी पहिला डोस घेतला आहे. तर, 26 टक्के लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. गोव्यातील भारतीयांना तर राज्यात लस मिळतच आहे. मात्र राज्यात राहणाऱ्या परदेशी नागरिकांनाही आज विशेष कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे. राज्यात काम करणाऱ्या विशेषतः नेपाळी, चिनी नागरिकांसह अनेक परदेशी नागरिकांनी सकाळपासून कोविड लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी एकच गर्दी केल्याचे दिसले.

गोव्यात परदेशी नागरिकांचेही कोरोना लसीकरण,

कोविड निर्मूलन करण्यासाठी राज्य सरकारने राज्यात मे महिन्याच्या सुरुवातीला जुलै अखेरपर्यंत राज्यातील जनतेचे 100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले. त्यानुसार राज्यातील शहरी, नागरी तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण मोहीम राबवण्यास सुरुवात केली. त्याला केंद्रानेही उत्तम प्रतिसाद देत राज्य कोविडमुक्तीच्या दिशेने नेण्यास मदत केली. दरम्यान, जुलै महिन्यात राज्याच्या दौऱ्यावर असणाऱ्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी पणजी येथील कोविड लसीकरण केंद्राला भेट देऊन राज्यातील कोविड मोहिमेचे कौतुक केले होते.

राज्यात आज परदेशी नागरिकांसाठी विशेष मोहीम

देशात लस घेताना नोंदणीसाठी आधारकार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र राज्यात वास्तव्य करणारे परदेशी नागरीक यामुळे लसीकरणापासून वंचित राहत होते. त्यामुळे केंद्राने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे आज राज्यात परदेशी नागरिकांसाठी विशेष कोविड लसीकरण मोहीम राबवण्यात आली. राज्यात हॉटेल तसेच पर्यटन क्षेत्रात अनेक नेपाळी व चिनी नागरिक काम करतात. तसेच मागच्या लॉकडाऊनपासून अनेक परदेशी नागरिक भारतात वास्तव्याला आहेत. त्या सर्व नागरिकांनी आज कोविड प्रतिबंधात्मक लस घेऊन सरकारला धन्यवाद दिले.

राज्यात 90 टक्के लसीकरण पूर्ण

राज्यात आतापर्यंत 90 टक्के जनतेने कोविड लसीचा पहिला डोस घेतला आहे. 26 टक्के लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. राज्यातील मतदार यादीप्रमाणे सरकारने जुलै अखेरपर्यंत 100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र राज्यातील अनेक मतदार व्यवसाय व उद्योगानिमित्त परदेशी किंवा राज्याबाहेर वास्तव्याला आहेत. म्हणून राज्यात असणाऱ्या 90 टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

सीमाभागातील नागरिकांनाही राज्यात सहज लस उपलब्ध

राज्यात प्रत्येक आरोग्य केंद्रावर सहज कोविड प्रतिबंधात्मक लस उपलब्ध होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील लोक या लसीकरणाचा फायदा घेत आहेत.

हेही वाचा -भारतीय जनता पक्षाचे आंदोलन म्हणजे केवळ दिखावा - बाळासाहेब थोरात

ABOUT THE AUTHOR

...view details