सिंधुदुर्ग- जिल्ह्यात आणखी एक कोरोनाचा पॉझिटिव्ह रूग्ण सापडला आहे. देवगड- वाडा येथील 51 वर्षीय महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणे सतर्क झाली आहे.
सिंधुदुर्गात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, एकूण संख्या तीन - सिंधुदुर्ग कोरोना व्हायरस न्यूज
जिल्ह्यातील आता कोरोनाबाधित रूग्णांची संख्या तीन झाली आहे. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांनी माहिती दिली आहे.
medical officers
दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील दुसऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला डिस्चार्ज देत घरी पाठवण्यात आले होते. आरोग्य यंत्रणा चांगलीच 'पॉझिटिव्ह' असताना आता आणखी एक धक्का मिळाल्याने ती पुन्हा एकदा सतर्क झाली आहे. देवगडमधील या महिलेच्या घरातील दोन व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता तीन झाली आहे. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांनी माहिती दिली आहे.