महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिंधुदुर्गातील पर्यटन व्यवसायाला कोरोनाचे ग्रहण; व्यावसायिकांना लाखोंचा फटका - सिंधुदुर्ग

उन्हाळी सुटीच्या काळात मोठ्या प्रमाणात पर्यटक मालवण येथे दाखल होत असल्याने त्यादृष्टीने पर्यटन व्यवसायिकांनी नियोजन केले होते. मात्र, कोरोना संकट उभारल्याने उन्हाळी सुटीचा आनंद लुटण्यास येणाऱ्या अनेक पर्यटकांनी आपली रिसॉर्ट, लॉजिंगची केलेली आरक्षणे रद्द केली आहेत. यामुळे पर्यटन व्यवसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

malwan business loss
पर्यटण सिंधुदुर्ग

By

Published : May 6, 2020, 4:57 PM IST

सिंधुदुर्ग- जिल्ह्यातील मालवण हे पर्यटनाचे मुख्य केंद्र आहे. येथील किल्ले पहायला दर वर्षी सुमारे ३ लाख ५० हजार पेक्षा जास्त पर्यटक येत असतात. पर्यटनावर इथल्या लोकांना रोजगार मिळतो. मालवणातील १५०० तरुण हे बोट, जलक्रिडा या सारखे व्यवसाय करून आपल्या परिवाराचा गाडा हाकतात. मात्र, कोरोनामुळे मालवणातील पर्यटनाला ग्रहण लागले आहे. पर्यटन व्यवसाय कमी झाले असून तरुण बेरोजगार होण्याचा मार्गावर आहे.

माहिती देताना व्यवसायिक

जिल्ह्याच्या समुद्रकिनारी पर्यटकांना सेवा देण्यासाठी १५ हजारच्या जवळपास न्याहारी निवास केंद्रे आहेत. पर्यटन व्यवसायात प्रत्यक्ष ८ हजार बोटी व जलक्रीडा प्रकारात पर्यटन व्यवसाय करणाऱ्या तरुणांची संख्या हजारांच्या घरात आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मालवणमधील किल्ले, प्रवासी होडी वाहतूक, स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंगसह अन्य जलक्रीडा प्रकार पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहे. यामुळे किनारपट्टी भागातील पर्यटन ठप्प झाले आहे. तर, पर्यटक नसल्यामुळे अनेक हॉटेल व्यवसायिकांनीही आपले व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, लाखोंची उलाढाल थांबली आहे. युवकही बेरोजगार झाली आहेत.

कोरोनाचा मोठा फटका हा मालवणच्या पर्यटन व्यवसायाला बसला आहे. जिल्ह्याची पर्यटन राजधानी म्हणून मालवणकडे पाहिले जाते. मात्र, सप्टेंबर महिन्यापासून येथील पर्यटन व्यवसाय अवकाळी पाऊस, चक्रीवादळ यासारख्या समस्यांमुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. यात आता भर पडली ती कोरोना विषाणूची. गणेशोत्सव, दिवाळीचा हंगाम कोरडाच गेल्याने उन्हाळी सुटीतील पर्यटनाचा हंगाम बहरेल आणि झालेले नुकसान भरून काढता येईल, अशी अपेक्षा पर्यटन व्यावसायिकांना होती. मात्र, कोरोना विषाणूमुळे त्यांच्या अपेक्षांवर पाणी पडले आहे.

उन्हाळी सुटीच्या काळात मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे दाखल होत असल्याने त्यादृष्टीने पर्यटन व्यावसायिकांनी नियोजन केले होते. मात्र, कोरोना संकट उभारल्याने उन्हाळी सुटीचा आनंद लुटण्यास येणाऱ्या अनेक पर्यटकांनी आपली रिसॉर्ट, लॉजिंगची केलेली आरक्षणे रद्द केली आहेत. यामुळे पर्यटन व्यवसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे, यावर्षीचा पर्यटन हंगामही धोक्यात आला असून व्यावसायिकांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे.

हेही वाचा-कोरोना अपडेट : जिल्ह्यात २ जण कोरोना पॉझिटिव्ह, ४८८ क्वारंटाईन

ABOUT THE AUTHOR

...view details