सिंधुदुर्ग- तौक्ते चक्रीवादळात कोकणातील झालेले नुकसान पाहता येथील लोकांच्या दुःखाचे निराकरण करता यावे म्हणून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील. असे सांगतानाच मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर टीका करणाऱ्या विरोधकांनी लक्षात घ्यावे पंतप्रधान नुकसानीची पाहणी करताना विमानातून जमिनीवरही उतरले नाहीत. मात्र, मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी स्वतः लोकांशी संवाद साधला आहे. विरोधी पक्षनेत्यांनी बेंबीच्या देठापासून राज्य सरकारवर टीका करण्यापेक्षा पंतप्रधानांना भेटून केंद्राकडून आपत्ती व्यवस्थापनाचे पैसे केंद्राकडून आणले तर त्यांना शाबासी देऊ, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरोधकांना लगावला.
राज्यपालांनी 12 आमदारांच्या यादीला मान्यता द्यावी
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सिंधुदुर्गात नुकसानग्रस्त भागाची रविवारी (दि. 23 मे) पाहणी केली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सुद्धा टीका केली. पटोले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावरही निशाणा साधला. राज्यपाल राज्याचे प्रमुख आहेत. जर आमचे काय चुकले असेल तर त्यांनी सांगणे हा त्यांचा अधिकार आहे. मात्र, अशाप्रकारे 12आमदारांची यादी दाबून ठेवणे योग्य नाही. मुंबईचे राज्यपाल कार्यालय हे भाजपचे कार्यालय झाले आहे. हे होता कामा नये, कारण राज्यपाल हा राज्याचा प्रमुख असतो. त्याला सगळ्यांचे कान ओढण्याचा अधिकार असतो. पण ज्या क्षेत्रातील लोकांची यादी जेव्हा मंत्रीमंडळाने निर्णय घेऊन राज्यपालांकडे पाठविली जाते तेव्हा राज्यपालांनी त्यावर विचार करायला हवा. एखादी व्यक्ती त्या क्षेत्रातील नसेल तर सरकारला सांगायला हवे. पण, ते दाबून बसणे आणि त्या क्षेत्रातील प्रतिनिधीला संपवणे ही भूमिका चुकीची आहे. म्हणून राज्यपालांना विनंती आहे की या सर्व प्रकरणावर पडदा पाडावा आणि ज्या 12 आमदारांची नावे पाठवली त्यांना मान्यता द्यावी.
केंद्राकडून महाराष्ट्राला 2 हजार कोटी मिळतील अशी आमची अपेक्षा