सिंधुदुर्ग -चिपी विमानतळ उदघाटनाच्या पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत व कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी चिपी विमानतळ प्रकल्पाला भेट देत आढावा घेतला. यावेळी त्यांनी एटीएस टॉवरची तसेच विमानतळाच्या यंत्रणेची पाहणी केली. तसेच अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देत उर्वरित कामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश खासदार विनायक राऊत यांनी यावेळी दिले.
महावितरण व बीएसएनएल विभागाने कामे पुर्ण करावी -
कोणत्याही परिस्थितीत २० जानेवारी २०२१ रोजी चिपी विमानतळ प्रकल्प सुरू करण्याचे टार्गेट आहे. ४ जानेवारीला अलायन्स कंपनीचे पथक याठिकाणी येणार आहे. त्यामुळे येत्या २० जानेवारीपर्यंत या प्रकल्पाला डीजीसीएची परवानगी मिळालीच पाहिजे. त्यादृष्टीने महावितरण व बीएसएनएल विभागाने किरकोळ कामे पुर्ण करून घ्यावीत, अशा सूचना त्यांनी उपस्थितीत अधिकाऱ्यांना दिल्या.
पहिले येणारे विमान अलायन्स कंपनीचे -