महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'आपल्या परवानगीशिवाय जिल्ह्यात ई-पास देऊन कोणालाही पाठवू नका' - ई-पास

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या ८ कोरोनाबाधित रुग्ण असून ते मुंबई, ठाणे परिसराशी निगडीत आहेत. जिल्ह्यात १२ हजार ८०० नागरिक दाखल झाले आहेत. त्यामुळे बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांमुळे कोरोनाचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी हे पत्र इतर जिल्ह्याधिकारी आणि पोलीस आयुक्तांना दिले आहे.

collector
जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

By

Published : May 17, 2020, 5:20 PM IST

सिंधुदुर्ग- बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना आपल्या परवानगीशिवाय ई-पास देण्यात येऊ नयेत, असे पत्र जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी इतर जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस आयुक्तांना दिले आहे. सध्या जिल्ह्यात असलेले ८ रुग्णही मुंबई, ठाणे परिसराशी संबंधीत असल्याचेही त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले हेच 'ते' पत्र

बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांचा लोंढा सध्या वाढला असून आजपर्यंत 12 हजार 800 लोक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे 8 कोरोना बाधित रुग्ण मुंबई, ठाणे परिसराशी संबंधित आहेत. या नागरिकांमुळे जनतेत संसर्ग पसरल्यास हा रोग येथील मर्यादीत आरोग्य सुविधेमुळे आटोक्यात आणणे अशक्य होईल. त्यात येथील संस्थात्मक कॉरंटाईनची मर्यादा संपली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले हेच 'ते' पत्र

जिल्ह्यात सध्या मुंबई, ठाणे, पुणे येथील रेड झोनमधून दाखल होणाऱ्या नागरिक आणि स्थानिक यांच्यात वादाचे प्रकार घडत आहेत. त्यामुळेल कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची चिन्हे आहेत, असेही जिल्हाधिकारी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. हे पत्र त्यांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, सोलापूर, नागपूरच्या पोलीस आयुक्त व ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, सोलापूर, औरंगाबाद या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱयांना पाठविले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details