महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना लसीकरणामध्ये उणिवा राहू नयेत – के. मंजूलक्ष्मी - जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या बद्दल बातमी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाच्या लसीकरणाची रंगीत तालमीला आज उपजिल्हा रुग्णालयात सुरूवात करण्यात आली. या वेळी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी ठिकाणी भेट दिली

collector said,  taking a dry run to ensure there are no shortcomings in corona vaccination
कोरोना लसीकरणामध्ये उणिवा राहू नयेत – के. मंजूलक्ष्मी

By

Published : Jan 8, 2021, 8:09 PM IST

Updated : Jan 8, 2021, 8:37 PM IST

सिंधुदुर्ग - कोरोना लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणात कोणत्याही उणिवा राहू नयेत यासाठी लसीकरणाची रंगीत तालीम (ड्रायरन) शुभारंभ गुरुवारी उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली. जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी याप्रसंगी भेट देत एकूण तयारीचा आढावा घेतला. कोरोना लासिकरणामध्ये उणिवा राहू नयेत, म्हणूनच रंगीत तालीम घेत असल्याच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

कोरोना लसीकरणामध्ये उणिवा राहू नयेत – के. मंजूलक्ष्मी

जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी होते उपस्थित -

यावेळी जिल्हाधिकाऱ्यानी नाव नोंदणी पासून लसीकरणानंतरच्या तयारीची पाहणी करून काही सूचनाही केल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे, तहसीलदार आर. जे. पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय पोळ, डॉ. श्रीराम चौगुले, डॉ. सतीश टाक, डॉ. सी. एम. शिकलगार यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

ड्रायरनमध्ये आज आरोग्य कर्मचाऱ्यांच्या २५ जणांची रंगीत तालीम -

लसीकरणाच्या ड्रायरन मध्ये आज आरोग्य कर्मचाऱ्यांच्या २५ जणांची रंगीत तालीम घेण्यात आली. त्यानंतर पुढील टप्प्यात प्रत्यक्ष लसीकरण सुरू होईल. यात आरोग्य, शासकीय महसूल, जिल्हा परिषद कर्मचारी, नंतरच्या टप्प्यात ५० ते ६० वर्षावरील नागरिक व त्यानंतर सर्वसामान्यांसाठी लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणाबाबत काही शंका असल्यास टोल फ्री १०७७ व जिल्हा रुग्णालयातील आपत्कालीन विभागातील फोन नंबर यासाठी उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

Last Updated : Jan 8, 2021, 8:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details