सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या अती जोखमीच्या संपर्कातील आणखी 8 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तर मंगळवारी पाठविलेल्या 59 नमुन्यांचे अहवाल येणे बाकी आहे. जिल्ह्यातील 116 अहवाल मंगळवारी निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात एकूण 24 हजार 759 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात असून त्या पैकी 409 व्यक्ती या शासकीय संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहेत. तर 24 हजार 350 व्यक्तींना गावपातळीवरील अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 24 हजार 759 व्यक्ती अलगीकरणात
जिल्ह्यातील एकूण 17 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 7 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून सध्या 10 रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. एकूण 24 हजार 759 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यात प्रवेश केलेल्या इतर सर्व नागरिकांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 1 हजार 552 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 1 हजार 298 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 17 अहवाल पॉझिटिव्ह आले असून उर्वरित 1 हजार 281 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अजून 254 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या 107 रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी 71 रुग्ण डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये, 36 रुग्ण डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत आज रोजी 5 हजार 880 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील एकूण 17 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 7 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून सध्या 10 रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
परराज्यातून व राज्याच्या अन्य जिल्ह्यांतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2 मेपासून आज अखेर एकूण 45 हजार 436 व्यक्ती दाखल झाल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.